‘फिटनेस क्‍वीन’ दिशा पाटनीचा बर्थडे प्लॅन ‘रेडी’ ; टायगर श्रॉफची ‘दांडी’ ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी १३ जूनला आपला २७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. असे समजले जाते की, दिशाने आपल्या वाढदिवसाची तयारी जोरदार केली आहे. याच दरम्यान चाहत्यांचा एक प्रश्न आहे की, तिच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये तिचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ ही सहभागी होणार का?

एका मुलाखतीत दिशाने सांगितले की, आता मी मोठी झाली आहे. माझ्या वाढदिवसाला सगळ्यांचे मेसेज आणि कॉल येतील यासाठी मला वेगळे वाटत आहे. मला वाटते की, वाढदिवशी जेव्हा मेसेज कॉल येतात त्या दिवशी सगळे भरभरून शुभेच्छा देतात तो दिवस संपला की असे वाटते की आता वाढदिवस संपला.

दिशा पुढे म्हणाली की, ती आता ‘मलंग’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. कदाचित ती आपल्या फ्रेंड्सला डिनरला घेऊन जाऊ शकते. जेव्हा तिला विचारले गेले की, टायगर श्रॉफ ही तुझ्या प्लॅनमध्ये सहभागी असणार का ? तेव्हा दिशा म्हणाली की, सध्या तरी कोणताच प्लॅन नाही पाहू पुढे काय होते.

दिशाच्या चित्रपटाविषयी बोलायचे म्हणले तर ‘मलंग’ चित्रपटाला डायरेक्ट मोहित सूरी करत आहे. या चित्रपटात दिशा व्यतिरिक्त अनिल कपूर, आदित्य कपूर आणि कुणाल खेमू दिसणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी ‘वैलेंटाइनस डे’ ला प्रदर्शित होणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त –

गरोदरपणातील समज-गैरसमज ? जाणून ‘घ्या’ सत्य

यामुळेही वाढू शकतो ‘टाइप-२ डायबिटीस’चा धोका

पोटाचा अल्सर असल्यास आढळतात ‘ही’ १० लक्षणे

‘या’ पाण्याचे आहेत अनेक फायदे ; अशक्तपणा दूर करण्यासह बरच काही