हेलन यांच्याकडून प्रेरणा घेत तयार झाला दिशाचा ‘स्लो मोशन लूक’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – सगळ्यांना आपल्या तालावर नाचवणारी बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री व डान्सर हेलनचा डान्स कोणी विसरु शकत नाही. यांच्या अनेक गाण्याचे रिमेक आले. पण, या अभिनेत्रीसारखा डांन्स नवीन कोणतीच अभिनेत्री करु शकली नाही. आजही तिच्या डान्सची चर्चा होत असते. अनेक अभिनेत्रीने यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे. सध्या अभिनेत्री दिशा पटानी सुद्धा हेलन यांची प्रेरणा घेत आहे.

अब्बास जाफर दिग्दर्शित ‘भारत’ सिनेमातील स्लो मोशन गाणे काही दिवसांपुर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आले. या गाण्यातील दिशाचा लूक हेलन यांच्याकडून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला आहे. दिशाला तिचा या गाण्यातील लूक खुप आवडला आहे. यासाठी दिशाने तिच्या लुकसाठी डिझायनरचे धन्यवाद देखील दिले आहे. या चित्रपटातील सलमान खान आणि दिशा पटानीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली आहे.

‘भारत’ हा चित्रपट येत्या ५ जून ला सर्वत्र प्रदर्शित होणार असून हिंदीशिवाय, तमिळ, आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तपर्यंतच्या कथा प्रेक्षकांना ‘भारत’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट मेकर्सना लिमिटेड ऑडियन्सपर्यंत मर्यादित न ठेवता या चित्रपटाला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे. भारतच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे, अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जाफर यांनी केले आहे.

https://www.instagram.com/p/Bwr1hs8F0vU/?utm_source=ig_embed

या चित्रपटात अभिनेता सलमान खान, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर आणि अभिनेत्री दिशा पटानी, नोरा फतेही, तब्बू अशा कलाकारांची मोठी आणि तगडी फौज आहे. यामध्ये अ‍ॅक्शन, रोमॅन्स त्याचबरोबर देशभक्ती पाहायला मिळणार आहे. चार टप्प्यात सिनेमाची कथा उलगडणार आहे.