टायगर श्रॉफसोबत ‘बागी’ फ्रेंचायजीमध्ये दिसलेल्या दिशा पाटनीनं सिनेमाबद्दल केलं मोठं वक्तव्य !

पोलिसनामा ऑनलाइन –अभिनेत्री दिशा पाटनीचं म्हणणं आहे की, बागी फ्रेंचायजीमुळं तिला बॉलिवूडमध्ये पाय रोवण्यास मदत झाली आहे. दिशानं 2018 मध्ये बागी 2 या सिनेमात टायगर श्रॉफ सोबत काम केलं आहे तर यावर्षी आलेल्या बागी 3 या सिनेमात तिनं आयटम नंबर केला आहे.

बागीबद्दल बोलताना दिशा पाटनी म्हणते, “आपले डान्सिंग स्किल्स सुधारण्यापासून तर बागी 3 मध्ये सोलो परफॉर्मंस देण्यापर्यंत मी एक लांबचा प्रवास केला आहे आणि यासाठी मला बागीचीच या प्रवासात मला मदत झाली आहे. पुन्हा एकदा बागी कुटुंबाचा हिस्सा झाल्याबद्दल मी आभारी आहे. ही संधी दिल्याबद्दल मी साजिद सरांचे आभार मानते.

https://www.instagram.com/p/B_HVm8Pgs5Y/?utm_source=ig_embed

बागी 3 या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर अहमद खान दिग्दर्शित आणि साजिद नाडियाडवाला निर्मित बागी 3 सिनेमात श्रद्धा कपूर, रितेश देशमुख, टायगर श्रॉफ आणि अंकिता लोखंडे हे कालाकार प्रमुख भूमिकेत आहेत.

दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं काही दिवसांपूर्वीच ती मलंग सिनेमात दिसली होती. याशिवाय काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या बागी 3 सिनेमात दिशा आयटम नंबर करताना दिसली. लवकरच दिशा आगामी सिनेमा राधे : योर मोस्ट वॉन्टेड भाई या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ती सलमान खानसोबत काम करणार आहे.