Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; अधिवेशनात फडणवीसांची घोषणा

नागपूर : लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी रिया चक्रवर्ती प्रकरण काढले. त्याला 24 तास उलटत नाहीत तोच विधानसभेत शिंदे गटाने दिशा सालियन प्रकरण काढले. शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांनी दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभा आणि विधानपरिषदेत आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांनी चौकशीची मागणी केली. याप्रकरणावरून झालेल्या गोंधळामुळे अध्यक्षांनी पाचवेळा विधानसभेचे कामकाज तहकूबही केले होते.
या गोंधळावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्याचे आश्वासन सत्ताधाऱ्यांना विधानसभेत दिले. सध्या सालियन प्रकरण मुंबई पोलीसांच्या हातात आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, दिशा सालियन प्रकरणात कोणाकडे पुरावे असतील, तर ते त्यांनी द्यावे. विशेष तपास पथक त्याची चौकशी करेल. दिशा सालियन प्रकरण सीबीआयकडे कधीच नव्हते. सुशांत सिंह राजपूत प्रकरण सीबीआय हाताळत आहे. तसेच सालियन प्रकरणात सीबीआयचा कोणताही क्लोजर रिपोर्ट आलेला नाही. याबाबत जे काही पुरावे मांडले जात आहेत, त्यावर कोणताही राजकीय आकस न ठेवता निरपेक्ष चौकशी करण्यात येईल.
दिशा सालियन सुशांत सिंह राजपूत या बॉलिवूड अभिनेत्याची मॅनेजर होती. 8 जून 2020 रोजी मद्याच्या
नशेत असताना 14 व्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाला होता.
तसेच तिच्या मृत्यूच्या सात दिवसांनी 14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूत याने देखील गळफास
घेऊन आत्महत्या केली होती. दिशा सालियन प्रकरणाचे धागेदोरे सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाशी सुद्धा काही काळ जोडण्यात आले होते. तसेच आदित्य ठाकरे यांचे देखील दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नाव आले होते. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाने त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
Web Title :- Disha Salian Case | investigation of disha salian case by sit say devendra fadnavis
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Malaika Arora | अरहान खानला वाटते आई मलायकापेक्षा ‘ही’ व्यक्ती अधिक जवळची…