Disha Salian Case : नारायण राणेंच्या गंभीर आरोपानंतर पोलिसांचे पुराव्यांसाठी ‘आवाहन’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे. त्यातच सुशांतच्या असिस्टंट मॅनेजर दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे, असाही आरोप माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी केला होता. तिच्यावर पहिल्यांदा बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असा खळबळजनक आरोप राणेंनी केला. राणेंनी काल आरोप केला आणि आज मुंबई पोलिसांच्या मालवणी पोलीस ठाण्यामार्फत दिशा सालियन आत्महत्येचा सखोल तपास आणि संबंधित बाबींची शहानिशा करण्यासाठी लेखी व इतर पुरावे किंवा अधिक माहिती देऊ इच्छणाऱ्या व्यक्तीस संबंधित पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे मुंबई पोलिसांना राणेंनी केलेल्या आरोपानंतर जाग आली का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दिशाच्या मृत्यूनंतर मालवणी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा सर्व बाजूंनी तपास पोलीस करत आहेत. या संदर्भात सोशल मीडिया, वृत्तपत्र, वृत्तवाहिनीद्वारे विविध बातम्या प्रसिद्ध होत आहेत. त्या अनुषंगाने कोणतीही लेखी व इतर पुरावा किंवा माहिती देऊ इच्छीत असल्यास त्यांनी पोलीस अधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा. जेणेकरुन या प्रकरणाचा तपास व संबंधित बाबिंची शहानिशा करणे शक्य होईल, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. त्यामुळे दिशाचा खून झाला की तिने आत्महत्या केली असा प्रश्न निर्माण झाल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला राजकीय वळण आलं आहे. त्याने आत्महत्या केली नसून हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी काल केला. तसेच सुशांतच्या असिस्टंट मॅनेजर दिशाचा बलात्कार करुन हत्या करण्यात आली असल्याचाही आरोप राणे यांनी केला. त्यामुळे दिशा सालियन आत्महत्येला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. मालवणी पोलिसांनी केलेल्या आव्हानाबद्दल बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, जर दिशा सालियनच्या पोस्ट मॉर्टेम आहवालात तिच्या प्रायव्हेट पार्टला जखमा असल्याचं स्पष्ट झालं आहे. तर याबाबत पोलिसांनी तपास करावा. इतर पुराव्यांसाठी त्यांनी आवाहन करण्याची काही गरज नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like