फ्लिपकार्ट देणार ग्राहकांना Disney+Hotstar चं फक्त 99 रुपयांत प्रीमियम सब्सक्रिप्शन ? ऑर्डर करण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ सत्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियमची 99 रुपयांमध्ये एक वर्षाची मेंबरशीप घेण्याची ऑफर पाहिल्यावर फ्लिपकार्ट वापरकर्त्यांला पारावर नव्हता. कारण एवढी स्वस्त ऑफर कुठंच मिळू शकणार नव्हती. या ऑफरची मेंबरशीप 1499 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. म्हणजे 93 टक्क्यांची सूट होती. मग कोण नाही आकर्षित होणार नाही अशा ऑफरला? त्यामुळे हजारो ग्राहकांनी पैसे भरून मेंबरशीप घेतली होती. पण ग्राहकांचा हा आनंद खूप काळ टिकू शकला नाही.

आता फ्लिपकार्टने डिस्ने प्लस हॉटस्टार प्रीमियमची किंमत 99 रुपयांना घेण्यास नकार दिला आहे. तसेच ही चूक असल्याचेही म्हटले आहे.

फ्लिपकार्टने त्याला एक अनपेक्षित त्रुटी (Unexpected Error) असल्याचे सांगत त्यास फेक लिस्टिंग म्हटलं आहे. कंपनीने सांगितले की ही अधिकृत लिस्ट नाही.

या बेकायदेशीर यादीसाठी कोणत्याही प्रकारचे ट्रान्सक्षण न करण्याचे आवाहन फ्लिपकार्टने केले आहे. त्यांनी त्यांच्या प्लेटफॉर्मवरून ही यादी काढली असल्याचेही कंपनीने म्हटले आहे. फ्लिपकार्टने असेही म्हटले आहे की ज्यांनी 99 रुपये देऊन सदस्यता घेतली त्यांचे ऑर्डर रद्द केले जाईल आणि पैसे परत केले जातील.