रिलायन्स Jio चे ‘हे’ रिचार्ज महागले; जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या आयपीएल हंगामासाठी रिलायन्स जीओने बाजारपेठेत आणलेले Disney+Hotstar Vip ॲडऑनच्या किंमतीत मोठा बदल केला आहे. कंपनीने या विशेष टॅरिफ व्हाऊचरला 222 रुपयांमध्ये ऑफर करत होती. या द्वारे Disney+Hotstar Vip चे वार्षिक सबस्क्रिप्शन 15 जीबी डेटा मोफत दिला जात होता. मात्र आता हे डेटा पॅक आता महागले आहे. रिलायन्स जीओ हे डेटा पॅक 33 रुपयांनी महाग केले आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. ग्राहकांंना आता या पॅकसाठी 255 रुपये मोजावे लागणार आहेत. या पॅकसोबत मोफत आयपीएलचे सामने पाहता येणार आहेत.

Oney tech च्या रिपोर्टनुसार myjio ॲपमध्ये हे जुने पॅक नवीन किंमतीने दिसत आहे. आता ग्राहकांना या किंमतीचे रिचार्ज करावे लागणार आहे. जिओचा हा प्रीपेड प्लॅन आहे. यात 15 जीबी हायस्पीड डेडा मिळत आहे. तसेच Disney+Hotstar Vip पॅकही मिळू शकतो. डेटा संपल्यानतर स्पीड 64 केबीपीएस राहते. हा प्लॅन वापरकर्त्याला मूळ प्लॅनच्या वैधतेपर्यंत वापरता येणार आहे.

जुन महिन्यात रिलायन्सने हा प्लॅन युजर्ससाठी लॉंच केला होता. वर्षाचे रिचार्ज केले तर युजर्स Disney+Hotstar Vip सबक्रीप्शन घेऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांच्या फायद्यासाठई रिलायन्सने हा प्लॅन लॉंच केला होता. तसेच अन्य प्लॅनचे युजर्सही हा प्लॅन घेऊ शकतात. कंपनीने सप्टेंबरमध्ये आयपीएलचा प्लॅन इतरांसाठी खुला केला. जिओ प्राईम एक्सक्ल्युव टैरिफ व्हाऊचर्स 2399 रुपये, 2121 रुपये, 1699, 999, 599, 555, 444, रुपयांवरही लागू होऊ शकतो. जर ग्राहकाला Disney+Hotstar Vip सबस्क्रिप्शन हवे असेल तर 255रुपयांच्या प्लॅनचे रिचार्ज मारावे लागणार आहे. तसेचच 56 दिवसांची वैधता 84 जीबी डेटासह वर्षाचे Disney+Hotstar Vip सबस्क्रिप्शन प्लॅनही जीओवर उपलब्ध आहे. याशिवाय 612, 1004, 1206, 1208 असे जादा वैधता आणि डेटासह Disney+Hotstar Vip सबस्क्रिप्शन प्लॅनही जीओवर उपलब्ध आहेत.