पेन्शन योजनेपासून शिक्षकांना ‘वंचित’ ठेवण्याचा डाव

पदवीधर मतदारसंघाचे आ. सुधीर तांबे यांचा आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – शिक्षकांना २००५ पूर्वीची पेन्शन योजना लागू करावी, ही मागणी सर्व कर्मचाऱ्यांची आहे. सरकारकडे वेळोवेळी आपण सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, सरकारकडून फक्त आश्वासन देण्यात आले. या योजनेपासून सर्वांना वंचित ठेवण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केला आहे.

पेन्शन योजनेबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात डॉ. तांबे यांनी म्हटले आहे की, सर्व कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वीची पेन्शन योजना लागू करावी, ही आमची जुनी मागणी आहे. २००५ पूर्वी सेवेत असलेल्या परंतू २००९ नंतर शंभर टक्के अनुदानास पात्र झालेल्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, हे न्याय्य व सरकारच्या प्रचलित धोरणास अनुसरून आहे. पेन्शन योजनेबाबत विधान परिषदेत अनेकवेळा आवाज उठविला आहे. शिक्षण आयुक्तांसमोरही आंदोलने केली आहेत. परंतू सरकार हा प्रश्‍न जाणून बुजून प्रलंबित ठेवत आहे.

सरकारकडून राजकारण
सरकार या प्रश्नावर राजकारण करू पाहत आहे. सोमवारी १७ जून हा शाळेचा पहिला दिवस आहे. सरकारचे शेवटचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी १७ जून रोजी काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध नोंदवावा, असे आवाहन तांबे यांनी केले आहे.

सिने जगत –

‘फेमिना मिस इंडिया’चा ‘ताज’ राज्यस्थानच्या सुमन रावच्या डोक्यावर

‘बिग बॉस मराठी 2’ मध्ये एका नवीन स्पर्धकाची ‘एन्ट्री’

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘भयंकर’ चिडली, ‘त्या’ प्रियकराबाबत केला मोठा खुलासा

‘या’ टॉप ५ अभिनेत्रींचा चेहरा खुपच ‘भोळा’, ‘ती’ अभिनेत्री बॉलिवूडमध्ये नंबर २ वर, पहा सर्व फोटो