डिसेंबर 2019 पर्यंत फुरसुंगी येथील कचरा डेपो कायमचा बंद होणार : विजय शिवतारे

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे शहरातील उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोत कचरा टाकला जातो. येथील डेपोमध्ये डिसेंबर 2019 पर्यंत कचरा टाकणे कायम बंद होणार असल्याची माहिती पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्यमंत्री विजय शिवतरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या अकरा गावाच्या प्रश्ना बाबत आज राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी महापालिका आयुक्त सौरभ राव, गटनेते संजय भोसले तसेच उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री विजय शिवतरे म्हणाले की,उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये मागील 25 वर्षांपासून कचरा टाकला जातो.तेथील कचरा प्रकल्प बंद व्हावा. या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन करण्यात आले.या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आधिकायाशी चर्चा झाली असून पुणे शहरात नव्याने 5 कचरा प्रकल्प मार्च 2019 अखेर पर्यँत उभारली जातील. तर डिसेंबर अखेर उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथे कचरा टाकणे बंद होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
[amazon_link asins=’B00PQKR85E,B07D11MDBS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d6888c20-a2ea-11e8-b424-9bb1d85fe17e’]

ते पुढे म्हणाले की,गतवर्षी पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या अकरा गावामध्ये पायाभूत सुविधा देण्याची गरज असून नागरिकांना असंख्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे.त्याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.