कोल्हापूर महापालिकेत ‘राडा’, MIM च्या ‘प्रवक्त्या’ची महापालिका अधिकाऱ्यांनी केली ‘धुलाई’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोल्हापूर महापालिकते राडा झाला असून पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एमआयएमचे पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते शाहीद शेख यांची धुलाई केली. या हाणामारीत शेख हे जखमी झाले असून त्यांना तातडीने सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. शाहिद शेख यांनी घरकुल योजनेतील लाभ मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत वाद घातला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शाहीद शेख हे महापालिकेतील अधिकाऱ्यांना सातत्याने उद्धटासारखे बोलायचे आणि तुम्हाला बघून घेईन अशी धमकी देत होते. अधिकाऱ्यांना त्याचे वागणे खटकत होते. शुक्रवारी (दि.10) हा अतिरिक्त आयुक्तांना निवेदन द्यायला महापालिकेत आला होता. निवेदन देऊन खाली उतरत असताना शाहीद शेख आणि महापालिकेतील अधिकारी कर्मचारी आमने सामने आले.

शाहीद शेख यांनी पुन्हा अधिकाऱ्यांना उद्देशून काहीतरी बोलले. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी भडकले आणि त्यांच्या वाद झाला. याच वादातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शाहिद शेख यांची बेदम धुलाई केल्याचे समजतेय. या घटनेमुळे महापालिकेत काहीवेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मारहाणीत शाहीद शेख जखमी झाले असून त्यांना कोल्हापूरातील पीसीआर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/