भोसरीत शिवसैनिकांमध्ये ‘राडा’, पदाधिकाऱ्याची महिला पदाधिकाऱ्याच्या ‘कानशिलात’

पुणे/भोसरी : पोलीसनामा ऑनलाइन – भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर नाराजी नाट्याला सुरुवात झाली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे असताना तो भाजपला सोडण्यात आला. भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. मात्र, शिवसेनेच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला विश्वासात न घेता किंवा चर्चा न करता मतदारसंघ भाजपला सोडण्यात आला. यामुळे नाराज झालेल्या कार्य़कर्त्यांची बैठक आज बोलावण्यात आली होती. यामध्ये दोन पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला.

बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार हमरी-तुमरी झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत होऊन एका पदाधिकाऱ्याने महिला पदाधिकाऱ्याच्या कानाखाली लगावली. त्यामुळे दोन्ही पदाधिकाऱ्यांचे कार्य़कर्ते एकमेकांना भिडले. अखेर हे प्रकरण निगडी पोलीस ठाण्यात पोहचले. या ठिकाणी दोन्ही पदाधिकाऱ्यांनी गर्धी केली असून एकमेकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात आल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण पहायला मिळाले. तर काही पदाधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भोसरी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेने दावा केला होता. शिवसेनेकडे मतदारसंघ घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले. पंरतु महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपला सुटला. त्यामुळे कार्य़कर्त्यामध्ये नाराजी आहे. पुढील भूमिका ठरविण्यासाठी भोसरीतील पदाधिकारी कार्यकर्त्यांची आज बैठक आयोजित केली होती. यामध्ये महिला पदाधिकारी आणि एका पदाधिकाऱ्यामध्ये वाद झाला. एका पदाधिकाऱ्याने माजी खासदारांच्या कार्य़शैलीवर नापसंती व्यक्त करत आरोप केले. त्याला एका महिला पदाधिकाऱ्याने आक्षेप घेतला. यावरून हा वाद झाला.

Visit : policenama.com