तळेगाव दाभाडेमध्ये 2 गटात ‘राडा’, गाड्यांची तोडफोड

पुणे/तळेगाव दाभाडे : पोलीसनामा ऑनलाइन – तळेगाव दाभाडे येथे दोन गटांमध्ये तुफान राडा झाला असून दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला असून सध्या तळेगावमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन गटात झालेली भांडणं ही राजकीय वादातून झाली असल्याची चर्चा असून तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.

विद्यमान आमदार सुनील शेळके आणि माजी आमदार बाळा भेगडे यांच्या कर्य़कर्त्यांमध्ये पूर्वीच्या भाडंणातून वाद झाल्याचे बोलले जात आहे. माजी आमदार बाळा भेगडे यांच्या कार्यालयासमोरच हा प्रकार घडला आहे. आमदार सुनिल शेळके यांचे दोन आणि माजी आमदार बाळा भेगडे यांचे दोन कार्यकर्ते यामध्ये जखमी झाले आहेत. दरम्यान, बाळा भेगडे यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या दोन गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शेळके आणि भेगडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पूर्वी वाद झाले होते. याच वादातून आज दोन गटामध्ये वाद झाला असल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे तळेगावमध्ये तणावाची परिस्थिती असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे.

Visit : Policenama.com