कारमध्ये मोठ्या आवाजात गाणं लावल्याने दोन गटात ‘तुंबळ’ हाणामारी 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – कारमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावल्याने जवळकर नगर, पिंपळे गुरव येथे दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान गणपती खोत (50) आणि भास्कर गौतम खैरनार (48) यांनी परस्पर विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

खोत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भास्कर खैरनार, नयन खैरनार, हिमांशू खैरनार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोत, खैरनार कुटुंबीयांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मोठ्या आवाजात कारमध्ये गाणी लावली. याचा खोत जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. तर भगवान खोत यांच्या डोक्यात वीट मारून जखमी केले.

भास्कर खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भगवान गणपती खोत, योगिता खोत, वैष्णवी खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खैरनार त्यांची कार पुसत असताना आरोपी त्यांच्या कारजवळ आले. काहीही कारण नसताना हाताने व लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये भास्कर जखमी झाले आहेत. तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

जाणून घ्या. कुष्ठरोगाबाबतचे समज-गैरसमज

मोबाईल आणि कंप्युटरचा जास्त वापर करणाऱ्यांनी अशी घ्यावी “डोळ्याची” काळजी 

या टिप्स वाचून “मानसिक” आजाराला करा बाय-बाय 

“टाच” दुखीमुळे त्रस्त असाल तर, जाणून घ्या टाच दुखीची कारणे आणि उपाय