केरळमध्ये CAA चा वाद ‘विकोपा’ला ! केस दाखल झाल्यानंतर भाजपच्या खासदार शोभा करंदलाजे संतापल्या, म्हणाल्या – ‘आता वेळ आलीय’

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – सीएए वरून केरळमध्ये चांगलेच वातावरण तापले आहे. मल्लपुरम येथील खासदार शोभा करंदलाजे यांनी स्वतःवर तक्रार दाखल झाल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते म्हणाल्या पक्षपाती डाव्या विचार सारणी विरोधात समाजाने एकत्र येण्याची वेळ आली आहे. तसेच दलित परिवारांसोबत झालेल्या भेदभावानंतर कारवाई करण्याऐवजी त्यांच्यावरच तक्रारी दाखल केल्या जात आहेत. या आधी खासदार शोभा करंदलाजे यांच्या दिशाभूल आणि चुकीची माहिती पसरवण्याच्या आरोपावरून तक्रार दाखल करण्यात आली होती.

यानंतर अगदी आक्रमक पद्धतीने शोभा करंदलाजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिले, केरळ सरकारचा विजय असो ! चेरुकुन्नूमधील दलित कुटुंबांवर होणाऱ्या भेदभावविरूद्ध कारवाई करण्याऐवजी त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आहे. अयशस्वी आणि पक्षपाती डाव्या विचार सरणीवर दबाव आणण्याची वेळ आली आहे त्यासाठी सर्व समाजाने एकत्र यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

मल्लपुरम येथील मुख्य पोलीस अधिकारी अब्दुल करीम यांनी सांगितले की, शोभा करंदलाजे यांच्यावर अनेक वेग वेगळ्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खासदारांवर सांप्रदायिक शांतात भंग केल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे.नागरिकांत संशोधन कायद्यानंतर देखील पाण्याची समस्या तशीच असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

22 जानेवारी रोजी त्यांनी एक ट्विट करून म्हंटले होते की, मल्लपुरमच्या कुट्टिपुरम येथील हिंदूंनी सीएएचे समर्थन केल्यामुळे त्यांचा पाण्याचा सप्लाय बंद करण्यात आला आहे. यासोबत त्यांनी काही भांड्यांचे फोटो देखील शेअर केले होते.

https://twitter.com/ShobhaBJP/status/1220556370346307584

 

फेसबुक पेज लाईक करा –