नेहरूंचे योगदान पुसून टाकण्याचे कारस्थान : डॉ. मनमोहन सिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

काही वास्तूंमध्ये फेरबदल करून नेहरूंचे योगदान पुसून टाकण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी केला आहे. या संदर्भात डॉ. सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय, वाचनालय (एनएमएमएल) आणि तीन मूर्ती स्मारक यांच्यात केल्या जाणाऱ्या प्रस्तावित बदलांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

[amazon_link asins=’B00KGZZ824′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’0ce3b355-a9af-11e8-b2af-cf9ffd455124′]

दिल्लीतील तीन मूर्ती संकुलात आजवरच्या सर्व पंतप्रधानांचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावास काँग्रेसचा विरोध आहे. त्या पार्श्वभूमी सिंग यांनी मोदी यांना पत्र लिहिले असून या प्रकल्पातून पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा आणि योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्रामध्ये सिंग यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा हवाला देऊन म्हटले आहे की, वाजपेयी यांनी नेहरूंच्या निधनानंतर संसदेत केलेल्या भाषणात नेहरूंबद्दल गौरवोद्गार काढले होते. नेहरूंसारख्या उत्तुंग आणि महान व्यक्तिमत्त्वाचे तीन मूर्ती भवनात पुन्हा वास्तव्य होऊ शकणार नाही, असे वाजपेयींनी म्हटले होते. सध्याचे सरकार मात्र नेहरूंचा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. नेहरू हे केवळ काँग्रेसचे नव्हते तर ते संपूर्ण देशाचे होते, असे डॉ. सिंग यांनी म्हटले आहे.