बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनच्या वतीने नागरिकांना दिवाळी सरंजामचे वाटप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   बाणेर येथील धनकुडे फार्म येथे बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील गोर – गरीब नागरिकांना ना नफा – ना तोटा या तत्वावर सरंजाम वाटप करण्याचा कार्यक्रम संपन्न झाला , सदर कार्यक्रमाचे उदघाटन समारंभ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व आमदार चेतन तुपे पाटील , आमदार सुनील टिंगरे , पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या सौ. दिपाली धुमाळ , पुणे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा सौ. स्वाती पोकळे , मुळशी, भोर, वेल्हा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनील चांदेरे , कोथरूड विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सौ. ज्योतिताई सुर्यवशी या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला .

उदघाटन प्रसंगी शुभेच्छा देताना आमदार चेतन तुपे पाटील म्हणाले या परिसरातील नागरिक भाग्यवान आहेत बाबुराव चांदेरे सारखा लोकप्रतिनिधी त्यांना मिळाला आहे , सण २००६ साला पासून अखंड पणे या परिसरातील नागरिकांची दिवाळी गोड साजरी केली जाते याचे अनुकरण इतरांनी घेणे आवश्यक आहे .
आमदार सुनील टिंगरे हे म्हणाले बाबुराव चांदेरे हे अनुभवी, अभ्यासू व्यतिमहत्व असल्याने त्यांनी त्यांच्या कार्याने नियोजन बद्ध या बाणेर, बालेवाडी परिसराचा विकास केलेला आहे, रस्त्यावर उतरून कामे करून घेण्याची त्यांची ख्याती आहे म्हणूनच नागरिकांनी सण २०१७ ला लाटेत सुद्धा त्यांना पुन्हा प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली .

सौ. दिपाली धुमाळ म्हणाल्या बाबुराव चांदेरे महानगरपालिकेच्या सभागृहात सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करीत असतात . रविवार दि. ८ नोव्हेंबर रोजी समारोपाच्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोत व विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे , सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस युवक महाराष्ट्र प्रदेश विशाल काळभोर ,सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष तेजस शशिकांत शिंदे , विध्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनिल गव्हाणे , स्वप्नील दुधाने , निलेश माजिरे , संतोष पाषाणकर , मनोज बालवडकर , किरण बालवडकर , राहुल बालवडकर , चेतन बालवडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते .

समारोप प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य आयोजक बाबुराव चांदेरे म्हणाले सण २००६ साला पासून तर सण २०१६ पर्यंत अखंडपणे दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम केला परंतु या परिसरात विठु माऊलीची शिधा वाटप योजना सण २०१६ ला सुरू झाली, गोर- गरीब नागरिकांना शिधा वाटप होऊ लागले परंतु सण २०१७ ची निवडणूक संपल्यानंतर शिधा वाटप बंद करण्यात आला.सण २०२० या काळात कोविड- १९ च्या प्रादुर्भावामुळे गोर-गरीब नागरिक खुप अडचणीत सापडला होता त्या अनुषंगाने परिसरातील नागरिकांनी लॉकडाउनच्या कार्यकाळात पाच ते सहा हजार कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले , सण २००६ साला पासून जे उपक्रम सुरू केलेत ते आज तागायत सुरू ठेवलेले आहेत .

माझा सरंजाम वाटपाचा कार्यक्रम पाहून इतरांनी तो सुरू केला याचा आनंद मला व माझ्या सर्व सहकार्यांना आहे कारण परिसरातील गोर – गरीब नागरिकांना याचा लाभ होत आहे याचे सातत्य टिकणे आवश्यक आहे .आमदार शशिकांत शिंदे म्हणाले काही लोकांना निवडणूकी पुर्त देव आठवतो पण इथे सर्वसामान्य माणसामध्ये आम्हाला देव दिसत आहे हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून समाजाची बांधिलकी ठेवणारे व जपणारे बाबुराव चांदेरे यांचा आम्हाला अभिमान वाटतो आणि समाजासाठी काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे फार मोठे समाधान मला वाटते .

यावेळी अर्जुन शिंदे , बाबुराव विधाते , अर्जुन ननावरे , जंगल रणवरे , समीर चांदेरे , विशाल विधाते , शेखर सायकर , संजय ताम्हाणे , बालम सुतार , प्राजक्ता ताम्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कळमकर यांनी व आभार प्रदर्शन प्रणव कळमकर यांनी केले .