इंदापूर नगरपरिषदेकडून व्यापाऱ्यांना डस्टबीनचे वाटप

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन(सुधाकर बोराटे) – इंदापूर शहर स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा 2020 अंतर्गत इंदापूर शहरातील सर्व प्रभागांची  स्वच्छता  नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल तसेच सर्व नगरसेवकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून  या स्वच्छतेच्या  उपक्रमातील  एक भाग म्हणून आज  शहरातील व्यापाऱ्यांना  डस्टबिन चे मोफत वाटप करण्यात आले. शहरातील बस स्थानक परिसरातील  व्यापाऱ्यांना प्राथमिक स्वरुपात डस्टबिन चे वाटप करण्यात आले.

बसस्थानक परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत ओला व सुका कचरा वेगवेगळा करून  घंटागाड्या मधेच दररोज देण्याचा निर्धार केला असून बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहू  असे व्यापार्‍यांनी नगरपरिषद प्रशासनाला आश्वासन दीले. यावेळी त्यांनी स्वच्छ इंदापूर, सुंदर इंदापूर, हरित इंदापूर करण्याचा संकल्प व्यक्त केला व इंदापूर नगरपरिषदेचे मानांकन स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये देखील राष्ट्रीय पातळीवर क्रमांक एक येण्यासाठी  शुभेच्छा दिल्या.यावेळी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, नगरसेवक भरत शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा यांच्या हस्ते व्यापाऱ्यांना डस्टबिन चे वाटप करण्यात आले.

यावेळी सर्व नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छतेची ही चळवळ देशपातळीवरील स्वच्छता स्पर्धेच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी दिली.यावेळी सागर गानबोटे, गणेश रोडे, बाप्पू काळे, आशानंद नागपुरे, गणेश कांबळे, सचिन ओहळ, हरीश पाटील, प्रकाश भिसे, रिजवान मोमीन, भरत देशमाने, प्रकाश चौधरी, नवनाथ कचरे तसेच गजानन पुंडे, वर्षा क्षिरसागर, सुभाष ओहाळ,औक्षणी मते, श्रद्धा वळवडे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अल्ताप पठाण यांनी केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/