राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या 21व्या वर्धापन दिना निमित्त होमिओपॅथी औषधाचे वाटप

थेऊर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीशी संलग्न असलेल्या यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पाट्रीच्या 21 व्या वर्धापन दिना निमित्त लोणी काळभोर येथील जेष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी, पोलिस,आशा सेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांना ARSENICUM ALBUM 30 या होमिओपॅथी औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम लोणी काळभोर येथील ग्रामपंचायत कार्यालयात पार पडला.

यावेळी प्रतापराव गायकवाड (माजी – सभापती कृषी उत्पन बाजार समिती पुणे) , यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधवराव काळभोर, साधना सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष काळभोर, तसेच यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुर्यकांत गवळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर,लोणी काळभोरच्या सरपंच आश्विनी गायकवाड, उपसरपंच राजाराम काळभोर,माजी सरपंच भोलानाथ शेलार पोलिस निरीक्षक सुरज बंङगर माजी उपसरपंच आण्णासाहेब काळभोर, प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डाॅ दगडू जाधव, अशोक गायकवाड, राजेंद्र काळभोर,अप्पासाहेब काळभोर, दिग्विजय काळभोर , ग्रामसेवक पवार,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे,हवेली तालुका अध्यक्ष महेश फलटणकर, दिलीप भोसले, निजाम तांबोळी, पत्रकार शरद पुजारी, गणेश धुमाळ,सतीश सासवडकर , अ‍ॅड. अनिता सुर्यकांत गवळी, संगीता काळभोर हवेली इत्यादी उपस्थिती होते.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक संस्था या होमिओपॅथी औषधाचे वाटप करत आहेत यामुळे शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याने याचे सर्वत्र वाटत होत आहे.