हर्षवर्धन पाटील, रोहित पवार यांच्या इंदापूर आणि कर्जत मतदार संघासह 12 जागांवरून आघाडीचं अडलं !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाटपाची बोलणी जवळपास पूर्ण होत आली असून प्रत्येकी १०६ जागांवर एकमत झाले आहे. शरद पवार यांचे नातू रोहित पवार (कर्जत जामखेड) आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या (इंदापूर) या जागांसह १० ते १२ जागांबाबत एकमत होत नाही.

लोकसभा निवडणुकीच्या वेळी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने न सोडल्याने सुजय विखे यांच्यासह राधाकृष्ण विखे व अन्य काँग्रेसचे असंख्य पदाधिकारी भाजपावासी झाले. राष्ट्रवादीचा दणदणीत पराभव करीत सुजय विखे निवडून आले. तेथे भाजपाचाच विद्यमान खासदार होता. पण इंदापूरचे तांगडे वेगळे आहे. तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्ता भरणे हे विद्यमान आमदार आहे. विद्यमान आमदाराला डावलून ती जागा काँग्रेसला सोडण्यास अजित पवार यांचा विरोध आहे. कर्जत जामखेड ही जागा काँग्रेसकडे आहे. ही जागा सोडायला काँग्रेस तयार आहे. त्या बदल्यात श्रीगोंदा ची जागा काँग्रेसने राष्ट्रवादीकडे मागितली आहे. तेथे राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप हे निवडून आले आहेत. तसेच सोलापूरमधील मोहोळची जागा काँग्रेसने मागितली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश कदम हे तेथून निवडून आले असून गेल्या ३ वर्षापासून ते आर्थर रोड जेलमध्ये आहेत. म्हणून ही जागा काँग्रेसने मागितली आहे.

परभणी, पाथरी, मोर्शीवरुड, केज अशा काही जागांबाबत आघाडीत वाद आहे. लोकसभेप्रमाणे हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या किती पायात पाय घालतात त्यावर ही आघाडी अवलंबून राहणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –