बारूळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने सँनिटाईझर, मास्क, PPE किटचे वाटप

कंधार : बारूळ येथे सामाजिक कार्यकर्त्या आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने २७ जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सँनिटाईझर, मास्क,पीपीई किटचे वाटप करण्यात आले तसेच वृक्षारोपण कार्यक्रम आयोजक ओम लाला ठाकूर यांच्या नियोजनाखाली घेण्यात आला.

आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या सुविद्य पत्नी तथा सामाजिक कार्यक्रत्या आशाताई शिंदे यांच्या वाढदिवसाचे सर्व खर्चिक कार्यक्रम रद्द करून सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम कंधार लोहा मतदार संघात राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कंधार तालुक्यातील बारूळ येथे २७ जुलै रोजी सँनिटाईझर, मास्क,पीपीई किटचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी यावेळी डॉ. पाचेवार साहेब,सिस्टर अंजली मैडम,नुगुलवार मैडम,सूर्यवंशी मैडम, पंचायत समिति सदस्य दिगंबर पाटील वडजे, मा. सरपंच गोपाळराव लाटकर, पोलिस पाटील संजय जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष कोंडिबा पाटील, उपसरपंच सुरेश रहाटे,चेअरमन पुंडिलक गालशेटवाड,आयोजक ओम लाला ठाकूर ,नारायण सावकार कुंभारे, संतोष पा. कौंसले, इसराईल पठाण, पांडूसिंग ठाकूर, बलराम ठाकूर, उत्तम कांबळे, हेमंत कांबळे, संतोष मुदमवाड, व सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.