पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या सेवागौरव, गुणवंत पुरस्काराचे सासवड येथे वितरण

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे ) –” केवळ प्रशासन , शिक्षकांमुळे शाळा चालत नाही, याची जाणीच व्हावी, अशी भावना शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी व्यक्त केली. पुरंदर तालुका शिक्षकेतर संघाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सेवागौरव, गुणवंत पुरस्कारांचे सासवड ( ता . पुरंदर ) येथे त्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले . या प्रसंगी ते बोलत होते . न्यू इंग्लिश स्कूल गुरोळीचे मुख्याध्यापक रामदास जगताप , शिवशंभो विद्यालय एखतपूर मुंजवडीचे लेखनिक ज्ञानदेव ठोंबरे यांच्यासह १९ जणांचा सन्मान करण्यात आला . मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत व बुद्धिमत्ता परीक्षेत यश मिळविणाऱ्या विरेन चाचर या वद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला . शिवाजीराव खांडेकर , संजय धुमाळ , अशोक बाणे , सिद्राम कांबळे , पांडुरंग जाधव , प्रसन्न कोतूळकर , कुंडलिक मेमाणे , तानाजी झेंडे , संतोष नवले यांनी मनोगत व्यक्त केले , नंदकुमार सागर, निलेश जगताप , संजय भिंताडे , प्रल्हाद कारकर , बळवंत गरुड , दिलीप नेवसे रामप्रभू पेटकर , रामदास शिंदे , इस्माईल सय्यद , सोमनाथ उबाळे आदी उपस्थित होते.

पुरस्कार , पुरस्कारार्थी पुढीलप्रमाणे

सेवागौरव पुरस्कार : आत्माराम शिंदे , माजी अध्यक्ष पुरंदर तालुका मुख्याध्यापक संघ गुणवंत

मुख्याध्यापक: रामदास जगताप ( न्यू इंग्लिश स्कूल , गुरोळी) गुणवंत शिक्षक: बापूसाहेब शिरसाट , (विषयतज्ज्ञ , पंचायत समिती , पुरंदर) , संतोष नवले ( केदारेश्वर विद्यालय ज्युनिअर कॉलेज , काळदरी ) , मोहिनी लोणकर ( कानिफनाथ विद्यालय , भिवरी )

गुणवंत लेखनिक : संजय दहितुले ( शिवाजी विद्यामंदिर, आंबळे) ज्ञानदेव ठोंबरे, ( शिवशंभो विद्यालय, एखतपूर, मुंजवडी ) संगीता चव्हाण जिजामाता हायस्कूल, जेजुरी ),  दत्तात्रय शिर्के ( माध्यमिक विद्यालय, मांढर ), मोहनलाल निगडे ( न्यू इंग्लिश स्कूल , जवळार्जन ).

गुणवंत सेवक : सुषमा भोसले ( कृषी औद्योगिक विद्यालय , चांबळी ) रंगराव निकम ( शंकरराव ढोणे विद्यालय , गराडे ) , धनराज माने (भुलेश्वर विद्यालय , माळशिरस ) , रघुनाथ जगदाळे ( पंचक्रोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय , वाघापुर ) , कैलास जगदाळे ( महर्षी वाल्मील विद्यालय, कोळविहिरे ) नियोजन ताकवले ( माध्यमिक विद्यालय , यादववाडी) बापू काकडे ( कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय , परिंचे ) , हिरामण जाधव ( रवींद्रनाथ टागोर विद्यालय , वीर )

visit : Policenama.com