राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक व जिल्हा संघटक पुरस्काराचे वितरण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन- (प्रा.सतीश भालेराव) – विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासची नव्हे तर क्रीडा कोचची गरज आहे. जीवनात किती पैसा कमविला याला किंमत नसून, निर्व्यसनी मुले व निरोगी शरीर हीच खरी संपत्ती आहे. खेळाने उत्तम व्यक्तीमत्व घडत असते. सदृढ समाजनिर्मितीसाठी खेळ महत्त्वाचा घटक असल्याची भावना आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपट पवार यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य व अहमदनगर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धेतील योगदानाबद्दल राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार, राज्य क्रीडा संघटक पुरस्कार, क्रीडा गौरव तसेच जिल्हा संघटक पुरस्काराचे वितरण आदर्शगाव हिवरे बाजार (ता.नगर) येथे झाले. यावेळी पोपट पवार बोलत होते. याप्रसंगी भारतीय फेन्सिंग असो. चे खजिनदार अशोक दुधारे, उद्योजक कैलास जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, शिवदत्त ढवळे, विश्‍वनाथ पाटोळे, दत्ता नारळे, किरण पाटील, राजेश जाधव, आनंद पवार, राजेश कदम, मयुर ठाकरे, नंदकुमार शितोळे, विजय जाधव, गणेश म्हस्के आदि उपस्थित होते.

दहशतवादाच्या समस्येला भारतच जबाबदार

पुढे पोपट पवार म्हणाले की, मैदानावर घडणार्‍या खेळाडूंना भावी जिवनात दु:खाचा सामना करावा लागत नाही. तर आरोग्य देखील निरोगी राहते. खेळाडू यशस्वी झाल्यास इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करीत असतो. खेळातील सांघिक भावना भावी जीवनात उपयुक्त ठरते. खेळाने जिंकलो तर हुरळून न जाण्याची व हरलो तर न खचता ध्येय प्राप्ती करण्याचे गुण विकसीत होत असल्याचे सांगून, त्यांनी आपल्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात क्रिकेट खेळत असतानाच्या घटनांचा उलगडा केला. तर खेळाडूवृत्ती अंगी असल्याने समाजकार्य उभे केल्याचे सांगितले.

‘आमच्या घरातील मुलांनी राजकारणात येऊ नये’ : सुप्रिया सुळे

कार्यक्रमाच्या प्रारंभी जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यातील शहिद जवानांना क्रीडा शिक्षकांच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली. पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष घनश्याम सानप यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. आयोजन समितीचे अध्यक्ष महेंद्र हिंगे यांनी अध्यक्षीय सुचना मांडली. प्रास्ताविकात कार्यक्रमाचे आयोजक तथा महासंघाचे राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी शाररीक शिक्षक हा शाळेचा आत्मा आहे. राज्याचे क्रीडा वैभव त्यांच्यामुळे टिकून आहे. अनेक दिग्गज खेळाडू घडविण्याचे कार्य क्रीडा शिक्षकांनी केले असून, मात्र शासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याची खंत व्यक्त करुन, क्रीडा शिक्षकांच्या कार्याचा गौरव करुन त्यांना मान सन्मान प्राप्त करुन देण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

अशोक दुधारे यांनी शासनाने क्रीडा शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. या पुरस्काराने क्रीडा शिक्षकांना भावी वाटचालीस प्रोत्साहन मिळणार असल्याचे सांगितले. कैलास जैन यांनी शाळेची शिस्त राखण्याचे काम क्रीडा शिक्षक करीत असतात. खेळाने विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहणार असून, आरोग्य चांगले असल्यास विद्यार्थी सर्वच क्षेत्रात प्रगती करु शकणार असल्याचे सांगितले.

भाजप-सेनेची युती जनतेसाठी नव्हे मातोश्रीच्या फायद्यासाठी : नारायण राणे

उदय जोशी म्हणाले की, राष्ट्रीय स्तरापासून ते ऑलम्पियन खेळाडू घडविण्याचे कार्य क्रीडा शिक्षक करीत असतात. शालेय जीवनातच खेळाडूच्या कारकिर्दीचा श्री गणेशा होत असतो. शालेय स्तरावर मिळालेल्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून तो खेळाडू आपले ध्येय गाठित असतात. क्रीडा शिक्षक हे खेळाडूंचे दीपस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले. जैन उद्योग समुह जळगावचे अशोक जैन यांचे वतीने राजेश जाधव यांचे प्रयत्नातून सर्व पुरस्कारार्थींना ट्रॅकसुट देण्यात आले .

यावेळी आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारार्थी:-
उमेश खंदारकर (जालना), संजय धोपावकर (अ.नगर), चंद्रकांत भोईटे (सातारा), विश्‍वास पाटील (धुळे), सुरकुटे सुनील (लातूर), अनिल माकडे (जळगाव), डॉ. भूषण जाधव (ठाणे), अविनाश बारगजे (बीड), प्रविण व्यवहारे (नाशीक), शिवाजी पाटील (कोल्हापूर), किरण फुलझेले (यवतमाळ), दत्तात्रय मारकड (सिंधुदूर्ग), सुनील खिलोटे (भंडारा), चेतन मानकर (गोंदिया), नरेश दळवी (पालघर), सतीश तासगावे (सांगली), अशफाक शेख (नागपूर), जयदिप सोनखासकर (अकोला), भूपेंद्र चौधरी (गडचिरोली), दिपक आंब्रे (मुंबई), विलास घोगरे (पुणे), पंकज पाठक (नंदुरबार), अनंत भाकरे (वर्धा), आबासाहेब नवले, (सोलापूर), चंद्रकांत देवरे (जळगाव), रविंद्र वासुसकर (रत्नागिरी), उमेश कडू (चंद्रपूर), क्रीडा गौरव पुरस्कारार्थी- डॉ.अनिल मैड (परभणी), गोवर्धन राठोड (बुलढाणा), जगदीश मरागजे (रायगड), क्रीडा पत्रकारिता पुरस्कारार्थी:- योगेश बोरसे, संजय दुधाणे, राज्य आदर्श क्रीडा संघटक- ज्ञानेश काळे (सातारा), आदर्श संस्था पुरस्कार- हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ (अमरावती), जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार्थी-अप्पासाहेब शिंदे, चंद्रकांत पाटील, सुनील गागरे, नंदकुमार शितोळे, शिरीष टेकडे, संजय भुसारी, अजित वडवकर, प्रशांत होन, शंकर बारस्कर यांना पोपट पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू कोहकडे यांनी केले. आभार आनंद पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदिप घावटे, बापू होळकर,दिनेश भालेराव, राजेश कदम, सुभाष नरवडे, राघवेंद्र धनलगडे, सोपान लांडे, दिपक ठाणगे आदिंनी परिश्रम घेतले.

तुमच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना तुमचा इतिहास कळलाच नाही : नितेश राणे