District Central Cooperative Bank | पुण्यासह ‘या’ 4 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका लवकरच; हाय कोर्टाची परवानगी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  District Central Cooperative Bank | काही दिवसांपुर्वी सांगली, सातारा जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका पार पडल्या. आता पुणे (Pune) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह (PDCC Bank Election) कोल्हापूर (Kolhapur District Central Cooperative Bank), सिंधुदुर्ग (Sindhudurg  आणि मुंबई (Mumbai District Central Cooperative Bank) या जिल्हा बँकांच्या निवडणुकांही लवकरच होणार आहेत. या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्यास मुंबई हाय कोर्टाने (Mumbai High Court) परवानगी दिलीय. या 4 जिल्हा बँकांच्या निवडणूक प्रक्रिया 29 नोव्हेंबरपासून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून (State Co-operative Electoral Authority) जारी करण्यात आली आहे.

 

पुण्यासह कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि मुंबई या 4 ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुका (PDCC Bank Election) घेण्यासाठी 29 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे सुरू होणार आहे. त्याप्रमाणे निवडणूक कार्यक्रम सहकारी प्राधिकरणाच्या मान्यतेने संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर करावा असं प्राधिकरणाचे सचिव यशवंत गिरी (Secretary Yashwant Giri) यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, या चारही जिल्हा बँकांच्या निवडणुकीबाबत हाय कोर्टात (Mumbai High Court) याचिका दाखल होत्या.
या याचिकेवर आज (शुक्रवारी) सुनावणी झाली. त्यावेळी याचिकाकर्त्यांना निवडणूक याचिका दाखल करण्याची मुभा आहे.
त्यामुळे त्यांनी निवडणूक याचिका दाखल करावी असे निर्देश देत सध्या दाखल असलेल्या या याचिका फेटाळल्या आहेत.
कोर्टाने चारही बँकांच्या निवडणूक पुढील आदेश होईपर्यंत जाहीर करू नये असे आदेश सहकारी निवडणूक प्राधिकरणाला दिले होते.
यानुसार आज हाय कोर्टाने निवडणूक घेण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Web Title : District Central Cooperative Bank | Elections for pune, mumbai, sindhudurg and kolhapur Central Co-operative Bank soon ; Permission of mumbai High Court

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Anil Kapoor | अनिल कपूर गंभीर आजाराच्या उपचारासाठी जर्मनीमध्ये; व्हिडिओ झाला व्हायरल

Hingoli Accident News | नोकरीच्या पहिल्याच दिवशी घरी परततानाझालेल्या अपघातात 2 चुलतभाऊ ठार

Nawab Malik | ‘राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून ‘BJP’ मध्ये गेलेले नेते घरवापसी करण्याच्या तयारीत’