धक्कादायक ! बहिणीच्या मदतीनं ‘त्यानं’ केला मेहुणीवर बलात्कार, प्रेग्नंट झाल्यानंतर ‘पर्दाफाश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चंदीगढमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली असून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ५ जणांविरोधात आरोप नक्की करण्यात आले आहेत. मात्र यात धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींमध्ये एक महिलादेखील असून पीडित मुलीच्या बहिणीच्या नवऱ्याचा देखील यामध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मे २०१९ मधील हि घटना असून पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता.

काय आहे घटना

पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनुसार, तिच्या बहिणीच्या नवऱ्याचे नाव अमित असून तिला खोटे बोलून आपल्या बहिणीच्या घरी घेऊन आला. मुलांची देखभाल करण्यासाठी तिला घरी घेऊन आल्याचे त्याने तिला खोटे सांगितले. त्यानंतर अमित तिला घेऊन आपल्या बहिणीच्या घरी गेला. त्यानंतर त्याची बहीण दोघांना घेऊन एका हॉटेलमध्ये गेली. जेथे आधीपासून चार व्यक्ती उपस्थित होते. यावेळी त्यांनी पीडितेला त्याठिकाणी सोडून दोघे निघून गेले. दोघे निघून गेल्यानंतर त्या चार व्यक्तींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. इतकेच नाही तर रात्री अमितने देखील तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावरच हे थांबले नाही तर अमितने त्यानंतर तिला त्याचा मित्र प्रवीणच्या घरी सोडल्यानंतर त्याने देखील तिच्यावर बलात्कार केला. ९ दिवसांनंतर ती आपल्या घरी परतल्यानंतर एक दिवस अचानक तिच्या पोटात दुखायला लागल्यानंतर तिने आपल्या बहिणीकडे याविषयी तक्रार केली. बहिणीने तिला डॉक्टरकडे नेले असता ती गर्भवती असल्याचे समोर आले.

दरम्यान, त्यानंतर पीडितेच्या तक्राराईवरून पोलिसांनी आरोपींना ६ जून रोजी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून १३ सप्टेंबर पासून त्यांच्यावर खटला चालवला जाणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त-

Loading...
You might also like