500 रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन –  नंदूरबार मधील डामरखेडा गावातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला ५०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे . शाळेची वार्षिक तपासणी सुरु असल्याने शेरे बुकवर चांगला शेरा देऊन त्रूटी न काढण्यासाठी 500 रूपये लाचेची मागणी मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेकडे केली होती .
याप्रकरणी महिला शिक्षिकेच्या पतीने तक्रार दाखल केली होती . नंदुबार जवळील रसवंतीगृहा जवळ 500 रुपये फिर्यादी कडुन घेण्याचे ठरले होते . त्याने लाच स्वीकारताच लाचलुचपत विभागातील अधिकारी यांनी त्याला रंगेहात ताब्यात घेतले . लोकसेवक मोरसिंग सोनु राठोड  , मुख्याध्यापक वर्ग 3 डामरखेडा – नंदूरबार (जिल्हा परिषद शाळा ) याला अटक करण्यात आली आहे . पोलीस निरीक्षक ला. प्र. वि अधिकारी संगिता एस. पाटील , पोलीस उपनिरीक्षक शिरीष जाधव यांनी हि कारवाई केली आहे .