मराठा समाजाच्या वतीने जिल्हास्तरीय उद्योग चर्चा सञ संपन्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – देवपूरातील अजय लॉन मध्ये उद्योगा बाबत चर्चा सञाचे आयोजन करण्यात आले. धुळे मराठा समाजाने स्वतःचे अस्तित्व वेळोवेळी सिद्ध केले आहे. अत्यंत जाज्वल्य ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या मराठा समाजाला मात्र उद्योग क्षेत्रात आजही अपेक्षित प्रगती कासाता आली नाही याचे संशोधन करून मराठा समाजाने उद्योग क्षेत्रात भरारी घ्यावी तरच आपले अस्तित्व टिकेल असे प्रतिपादन सावंतवाडी येथील प्राध्यापक रुपेश पाटील यांनी धुळे येथील मराठा उद्योजक लोबी अभियान मराठा उद्योजक कार्यक्रमात व्यक्त केले व्यासपीठावर मराठा उद्योजक लोबी चे संस्थापक अध्यक्ष विनोद बढे, चित्तेश्वर देवरे, डॉक्टर राहूल बच्छाव, संजय बोरसे, प्रशांत देवरे, दीपक अहिरराव, नितीन पाटील, भानुदास दे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्राध्यापक रुपेश पाटील यांनी मराठा समाजाच्या सद्यस्थिती समस्या व त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेतला. प्राध्यापक रुपेश पाटील पुढे म्हणाले की जगाच्या पाठीवर अत्यंत लढवय्या बाणा असलेल्या मराठा समाजाला आज स्वतःच्या न्याय व हक्कासाठी संघर्ष करावा लागतो याचे कारण म्हणजे मराठा समाजातील विखुरलेपण म्हणून आगामी काळात एकतेतून विधायक उद्योजकता करून समाजाचे समाजाने आदर्श निर्माण करावा असा आशावाद प्राध्यापक पाटील यांनी व्यक्त केला. डॉक्टर राहुल बच्छाव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की इतर समाजासोबत आपण उद्योग धंद्यात सहभाग घेत माहिती जाणून घेऊन समाजातील अन्य बेरोजगार बांधवांना रोजगार कसा उपलब्ध करून देता येईल यासाठी प्रयत्न करावा. छोटा व्यवसाय करत समाजातील बांधवांना यात सहभागी देत रोजगार वाढवावा.असे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन राजेंद्र जाधव, दिनेश काळे, सुनील पाटील, दीपक पाटील, राहुल सूर्यवंशी, दीपक रोंदळ, सुनील बाबरे, संदीप सूर्यवंशी, जितेंद्र पाटील, मनोज देवरे, संजय बोरसे, आदीनी केले.
सूत्रसंचालन डॉक्टर बिपीन पवार यांनी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us