खा.सुप्रिया सुळेंच्या विचारांची माणसे रमेश थोरतांना चालेना, राष्ट्रवादी किसान सेलच्या जिल्हाध्यक्षाचा भाजपमध्ये प्रवेश

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन (अब्बास शेख) – खा. सुप्रिया सुळेंच्या विचारांची माणसे रमेश थोरतांना चालत नसल्याचा आरोप करून पुणेजिल्हा राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष माऊली शेळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

याबाबत माऊली शेळके यांनी बोलताना माजी आमदार रमेश थोरात आणि त्यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता जाणीवपूर्वक त्यांना बाजूला ठेऊन काम करत आला आहे. आज राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अवस्था ही ना इकडे ना तिकडे अशी झाली आहे. थोरात गट हेतू पुरस्पर पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या प्रक्रियेमधून बाजूला ठेऊन स्वतः मनमानी कारभार करत आहेत. या लोकांना राष्ट्रवादीचे काही देणे घेणे नसून फक्त थोरात गट तालुक्यात मोठा करायचा आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची मोठी गळचेपी होत असून एक एक पदाधिकारी आणि स्वाभिमानी कार्यकर्ता राष्ट्रवादी सोडून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार राहुल कुल हे तालूक्याचा विकास डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेत विकासकामे करत असल्याचे प्रकर्षाने जाणवले. त्यातच चौफुला येथे दोन हजार एकरामध्ये MIDC चे काम सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न सुटणार असल्याने कुल यांच्या दूरदृष्टीचा आपल्याला अनुभव आला आणि त्यातूनच आपण भाजपमध्ये प्रवेश करून आमदार राहुल कुल यांना पाठिंबा दिल्याचे सांगितले.

Visit : Policenama.com 

शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या