शिक्षणमंत्र्यांच्या नावाने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचे दडपण !

क्रीडा शिक्षकांचा शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आरोप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या मनमानी व क्रीडा क्षेत्राच्या गळचेपी धोरणाविरोधात शालेय तालुका क्रीडा स्पर्धेत असहकार व पंच कामगिरीवर बहिष्कार आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर क्रीडा शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाचे म्हणणे व तक्रारी ऐकून घेऊन कुठल्याही शिक्षकावर आयोजनाची किंवा पंच कामगिरीची सक्ती अथवा कारवाई करणार नसल्याचे शिक्षणाधिकारी दिलीप थोरे यांनी आश्‍वासन दिले. यावेळी दिलेल्या निवेदनात क्रीडा शिक्षकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासोबत काम केल्याचा सांगून दडपण आणीत असल्याचा आरोप केला आहे.

शालेय स्पर्धेवर असकार व पंच कामावर सर्व तालुका प्रमुख, क्रीडा शिक्षक, क्रीडा शिक्षक संघटना व खेळ संघटना यांनी टाकलेला बहिष्कार व जिल्ह्यातील मुख्याध्यापक महासंघ, माध्यमिक शिक्षक संघटना यांचा पाठिंबा असल्याने तालुका क्रीडा स्पर्धेसमोरील संकट वाढत चालले आहे. या स्पर्धा आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी यांचेकडून तालुका प्रमुख, क्रीडा शिक्षक व खेळ संघटना यांच्यावर दबाव टाकण्याची शक्यता, शिक्षणमंत्र्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असल्याचे सांगून सामान्य शिक्षकावर दडपणाचे व भीतीचे वातावरण निर्माण करून प्रश्‍नांची सोडवणूक करण्याऐवजी आंदोलन दडपून टाकण्याची तयारी जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने चालू असल्याचे आरोप करीत सर्व संघटनांनी शिक्षणाधिकारी दिलीप थोरवे यांची भेट घेतली.

यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडून वापरण्यात येणारे दबावतंत्र याबाबत शिक्षणाधिकारी यांना अवगत करण्यात आले. शालेय आस्थापनेचे कर्मचारी म्हणून शिक्षकांना स्पर्धा कामी कार्यालयाकडून अडवणूक होऊ नये म्हणून शासनाच्या स्पर्धेस पंच नेमणुकीच्या पत्रावर प्रति स्वाक्षरी शिक्षणाधिकारी कार्यालयातून दिली जाते. स्पर्धेत पंच नेमणूक क्रीडा कार्यालय करते हे करत असताना अधिकृत पंचांची नेमणूक करणे अपेक्षित असते. याकामी शासकीय स्पर्धा असल्याने शिक्षणाधिकारी कार्यालय क्रीडा कार्यालयास सहकार्य करते. क्रीडा शिक्षकांच्या सहकार्याने स्पर्धा पार पडतात.

पंच कामगिरी व आयोजनासाठी शिक्षणाधिकारी शिक्षकावर कुठलीच सक्ती करत नाही व करण्यात येणार नाही. तसेच ऑनलाईन कामासंदर्भात कालावधी वाढून देण्यास सांगू असे शिक्षणाधिकारी यांनी यावेळी बोलताना सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या ऐकून घेऊन याप्रश्‍नी ना. राधाकृष्ण विखे यांची भेट घेऊन लक्ष घालणार असल्याचे सांगितले. शालेय स्पर्धेत क्रीडाधिकारी उपस्थित नसल्यास अथवा शालेय स्पर्धा आयोजन वेळेत न झाल्यास कायदेशीर बाबीसंदर्भात शिष्टमंडळातील पदाधिकारी आक्रमक होते.

या शिष्टमंडळात बाळासाहेब हराळ, शिवछत्रपती पुरस्कारार्थी सुनील जाधव, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, सायकलिंग असोचे महाराष्ट्रा सचिव संजय साठे, राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर महानगराचे रावसाहेब बाबर, उन्मेश शिंदे, अरविंद आचार्य, राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष घनश्याम सानप, जिल्हा सचिव शिरीष टेकाडे, तालुकाध्यक्ष महेंद्र हिंगे, मुख्याध्यापक त्रिंबक साळुंखे, सुभाष नरवडे, धन्यकुमार हराळ, विजय जाधव, रमाकांत दरेकर, भाऊसाहेब जिवडे, सतीश सुंबे, अविनाश रामफळे आदींसह क्रीडाशिक्षक हजर होते.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like