पंतप्रधान पिक विमा योजना फसवी ; पुण्यात सदाभाऊ खोत, अनिल बोंडेंच्या उपस्थित घोषणाबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरु केल्या. त्यातील पंतप्रधान पीक विमा योजना ही आहे. या योजनेवर काही लोकांनी आक्षेप घेत ही योजना फसवी असल्याचे आरोप केले आहेत. पुण्यातील वैकुंठभाई मेहता संस्थेत पंतप्रधान पीक विमा योजना आढावा बैठक सुरु असताना आंदोलक कार्यकर्त्यांनी ही योजना फसवी असल्याच्या घोषणा देत गोंधळ घातला. या कार्यक्रमात कृषीमंत्री नामदार अनिल बोंडे हेही उपस्थित होते. त्यांच्या समोरच हा सर्व गोंधळ झाला. त्यामुळे पोलीसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना सभागृहाबाहेर पाठविले आणि वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.

कृषी मंत्री अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक सुरू असताना स्वाभिमानी संघटनेचे काही कार्यकर्ते तेथे उपस्थित होते. सदाभाऊ खोत यांचे भाषण सुरु असताना या कार्यकर्त्यांनी कांगावा करत पंतप्रधान पीक विमा योजनेत भ्रष्टाचार होत आहे, असं सांगत त्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

या निषेधाचे नेतृत्त अजिंक्य नागटिळक हे करत होते. त्यांनी यावेळी त्यांचे मत व्यक्त केले. मराठवाडा भागात १९ कोटी शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य असे मिळून पीक विम्यासाठी एकूण १७७ कोटी रुपये भरले. त्याचा परतावा म्हणून त्यांना फक्त ३० कोटी मिळाले. बाकीचे १४३ कोटी कुठे गेले, हे पैसे कंपन्यांच्या घशात गेले म्हणून या योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आमचा आरोप आहे, असं स्पष्ट मत अजिंक्य यांनी मांडले.

दरम्यान, घडलेल्या प्रकारावर अनिल बोंडे यांनी सांगितले, कार्यक्रमावेळी दोन चार लोकांनी फक्त घोषणा दिल्या. त्यांनी त्यांच्या प्रश्नांविषयी भेट घेऊन बोलायला हवे होते. मात्र आंदोलन कार्यकर्त्यांना ही घटना राज्य पातळीवर घेऊन जायची आहे. त्यानंतर माध्यमांविषयी बोलताना, माध्यमं सुद्धा अशी ‘घाण’ दिसली की ती दाखवतात. शेतकऱ्यांना आपल्याला मिठाई द्यायची आहे. त्यामुळे घाण दाखवू नये. सकारत्मकता दाखवायला हवी, असं त्यांनी यावेळी म्हटलं.

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय