‘मी मागितले 700 कोटी पण भाजपाच्या या बड्या नेत्यानं दिले 1000 कोटी’, अपात्र आमदाराचा खळबळजनक दावा

बंगळुरु : वृत्तसंस्था – मोठ्या घडामोडीनंतर कर्नाटकात भाजपचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापन झाल्यानंतर एका अपात्र आमदाराने मोठा दावा केला आहे. अपात्र आमदार नारायण गौडा यांनी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी एक हजार कोटी रुपये दिले, त्यांना फक्त 700 कोटी मागतिले होते, असा दावा त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी दिलेले एक हजार कोटी विकास कामासाठीच वापरल्याचे गौडा यांनी सांगितले.

नारायण गौडा हे समर्थकांशी बोलताना म्हणाल, कुमारस्वामी सरकार पाडण्यापूर्वी एकजण पहाटे पाचच्या सुमारास माझ्याकडे आला. त्याने मला येडियुरप्पा यांच्या निवासस्थानी घेऊन गेला. त्यांच्या घरी गेलो त्यावेळी येडियुरप्पा देवपुजा करीत होते. त्यांनी मला बसायला सांगितले. त्यानंतर येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याचे नारायण गौडा यांनी सांगितले.

गौडा पुढे म्हणाले, मी कृष्णराजपेट मतदारसंघाच्या विकासासाठी 700 कोटी मागितले होते. त्यावेळी येडियुरप्पा यांनी 300 कोटी जास्त देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी मला दिलेला शब्द पाळला. येडीयुरप्पा यांनी 1000 कोटीचा निधी मंजूरही केला. याच कारणामुळे त्यांना पाठिंबा दिला. अपात्र ठरलेल्या आमदाराशी माझा काहीही संबंध नसल्याचंही येडियुरप्पांनी यानंतर सांगितले. कर्नाटकात मोठी उलथापालथ झाल्यानंतर भाजपने सरकार स्थापन केले. बंडखोरी करणाऱ्या 17 आमदारांना अपात्रही ठरवण्यात आले होते.

Visit : Policenama.com