युतीबाबत बोलण्याचा तिघांनाच ‘अधिकार’, महाजनांचा सेनेच्या रावतेंना ‘टोला’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – १४४ जागा न दिल्यास युती तुटणार या दिवाकर रावते यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन यांनी युतीबाबत बोलण्याचा फक्त तिघांना अधिकार आहे, असे सांगून रावते यांना टोला लगावला आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आघाडी झाली असताना शिवसेना भाजपामधील युतीबाबत दररोज उलटसुलट बातम्या येत आहे. याबाबत परिवहन मंत्री दिवाकार रावते यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी शिवसेनेला १४४ जागा न मिळाल्यास युती तुटण्याची शक्यता असून आम्हीही २८८ जागा लढविण्यास तयार आहोत, असे सांगितले होते.

दिवाकर रावते यांच्या विधानावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, युती १०० टक्के होणार आहे. युतीबाबतचे सर्व अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि फडणवीस यांनाच युतीबाबत बोलण्याचा अधिकार आहे. युतीबाबत ८० टक्के बोलणी यशस्वी झाली आहे. त्याबाबत जे काही सांगायचे ते हे तीन नेते सांगतील, असा टोला मारला आहे.

Visit – policenama.com