Divis Laboratories | 894 कोटी रुपयांचा नफा, आता फार्मा कंपनी प्रत्येक शेअरवर देईल 1500% लाभांश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – फार्मा कंपनी डिव्हिस लॅबोरेटरीज (Divis Laboratories) आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश भेट देणार आहे. डिव्हिस लॅबच्या बोर्डाने 2021 – 22 या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर 1500 टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे. सोमवार, 23 मे 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर डिव्हिस लॅबचा शेअर 9.5 टक्क्यांनी घसरून 3,897.55 रुपयांवर बंद झाला. डिव्हिस लॅबच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5,425 रुपये आहे. (Divis Laboratories)

 

प्रत्येक शेअरवर 30 रुपये लाभांश देण्याची तयारी
कंपनीच्या संचालक मंडळाने सोमवारी झालेल्या बैठकीत 2021 – 22 या आर्थिक वर्षासाठी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरवर 1500 टक्के (प्रति शेअर 30 रुपये) लाभांश देण्याची शिफारस केली आहे, असे कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

एजीएमच्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत लाभांश जमा केला जाईल. कंपनी एजीएमची तारीख आणि लाभांश भरण्याची रेकॉर्ड तारीख येत्या काही दिवसांत जाहीर करेल. Divis Laboratories चे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर 1,03,467 कोटी रुपयांचे मार्केट कॅप आहे.

मार्च तिमाहीत कंपनीला 894 कोटी रुपयांचा नफा
Divis Laboratories ने जानेवारी – मार्च 2022 तिमाहीत 894 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला.
गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या नफ्यात 78 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीला 502 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

मार्च 2022 च्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल 40 टक्क्यांनी वाढून 2,518 कोटी रुपये झाला.
जो मागील वर्षी याच कालावधीत 1,788 कोटी रुपये होता. Divis Laboratories अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल्स घटकांची एक आघाडीची उत्पादक आहे.

 

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

 

Web Title :- Divis Laboratories | divis labs board recommended dividend of 30 rupee per share

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा