व्हॉट्सअपवर तलाक दिला; पतीविरुद्ध नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल

वैजापूर : पोलीसनामा ऑनलाईन – मुस्लीम धर्मामध्ये पत्नीला मोबाईलवरुन तलाक देण्यास कोर्टाचा विरोध असताना देखील वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथ असाच एक प्रकार घडला आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार पतीविरुद्ध नव्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार पत्नी ही चाळीसगाव या आपल्या माहेरी आली असता पतीने व्हॉट्सअॅपवरुन तीन वेळा तलाक असा मेसज पाठवून तलाक दिला. याप्रकरणी जावेद साबेर पठाण याच्या विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा पद्धतीने पतीविरुद्ध गुन्हा दाखल होण्याची देशातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9b767f4c-d2c3-11e8-9906-c39df261b4b5′]

या प्रकरणी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार चाळीसगाव येथील निसार शेख यांची मुलगी शबाना हिचा डिसेंबर २०१६ मध्ये मुस्लिम रीतिरिवाजाप्रमाणे खंडाळा येथील जावेद साबेर पठाण याच्याशी विवाह झाला. लग्नानंतर एक वर्ष शबानाला चांगले वागवण्यात आले. पण एक वर्षानंतर जावेद हा शबानाला मुलगी झाल्याच्या कारणावरुन त्रास देत होता. ‘तुझ्या आईला पाच मुलीच झाल्या आहेत. तुला पण यानंतर मुलीच होतील. तुझ्या बहिणींना पहिला मुलगा झाला आहे, मग तुलाच मुलगी कशी झाली?’ असे विचारत ‘तू मला नको आहेस. मी तुला तलाक देणार असून, दुसरी बायको करणार आहे’ असे जावेद पत्नीला वारंवार म्हणत असे.

राम मंदिर उभारण्यासाठी सरकारनं कायदा करावा – मोहन भागवत

जावेदने ९ सप्टेंबर रोजी ‘तुला संभाजीनगरला दवाखान्यात घेऊन जायचे आहे’, असे म्हणून गाडीत बसवले. पण संभाजीनगरला न नेता त्याने तिला कन्नडला तिच्या मावशीकडे नेले. गाडी दुरुस्त करायची आहे, असे सांगत ते शबानाला मावशीकडे सोडून गेले. काही वेळाने गाडीचे काम कन्नडमध्ये होत नाही असे सांगून चाळीसगावला वडिलांकडे नेले. तेथून जावेद गाडीचालकासह गाडी दुरुस्तीसाठी गेलो पण परत घरी आले नाही. त्यानंतर कन्नड येथील मावसभावाकडून जावेद खंडाळा येथे गेल्याची माहिती मिळताच शबाना, निसार शेख व त्यांची पत्नी असे तिघे रात्री खंडाळा येथे आले. पण ‘मला तू नको आहेस’, असे म्हणून जावेदने तिघांना घराबाहेर काढले. त्यानंतर जावेदने २३ सप्टेंबर रोजी शबाना ऊर्फ सबा हिला मोबाईलद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर तीन वेळा तलाक असा मेसेज पाठवून बेकायदा तलाक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून जावेद पठाणविरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B06XXH82T4,B078TF9V6L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e0ae1257-d2c3-11e8-893c-b382d1446811′]