घटस्फोटीत महिला शिक्षका 11 वी च्या विद्यार्थ्याला घेऊन ‘फरार’, रोज घेत होती 4 तास ‘क्लास’

पानीपत : वृत्तसंस्था – विद्यार्थी आणि शिक्षकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना हरियानामध्ये उघडकीस आली आहे. क्लासला येणाऱ्या एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलाला घेऊन महिला शिक्षिका फरार झाली आहे. या प्रकरणात महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी ट्युशन टीचर घटस्फोटीत आहे. खासगी शाळेत टीचर म्हणून काम करत असलेली ही शिक्षिका आपल्या माहेरी राहात होती.

Hair Care : आरोग्यासह सौंदर्याचीही विशेष काळजी घ्या

संसर्ग नियंत्रित करण्यास नैसर्गिक औषध उपयुक्त; जाणून घ्या

तर याप्रकरणी तक्रार देणाऱ्या मुलाच्या वडीलांनी सांगितले की, त्यांचा मुलगा महिला शिक्षिकेकडे दररोज ट्युशनसाठी जात होता. रोजच्या प्रमाणे 29 मे रोजी तो ट्युशनसाठी दुपारी दोन वाजता घरातून गेला. मात्र, त्यानंतर तो परत आलाच नाही.

मुलाच्या घरच्यांनी त्याची बराच वेळ वाट पाहिली मात्र, तो आला नाही. त्यामुळे मुलाच्या घरच्यांनी ट्युशन टीचरच्या घरी जाऊन पाहिले असता महिलेच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणात महिला शिक्षिकेवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांचा शोध सुरु केला आहे. महिला आणि मुलगा बेपत्ता झाल्यापासून त्यांचा फोन स्वीचऑफ लागत आहे.

अल्पवयीन मुलगा मागिल दोन वर्षापासून महिलेकडे शिकवणीसाठी जात आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलगा महिलेच्या घरी चार ते पाच तास शिवकवणीसाठी जात होता. मात्र, दोघेही अचानक 29 मे रोजी बेपत्ता झाले आहेत. विशेष म्हणेज महिला शिक्षिकेने घरातून निघून जाताना सोबत कोणतेही सामान नेलं नाही. केवळ महिला शिक्षिकेच्या हातात सोन्याची अंगठी आहे.

READ ALSO THIS :

Fact Check : खरंच भारत सरकार 3 महिन्यांसाठी 10 कोटी युजर्संना फ्री इंटरनेट देणार? जाणून घ्या ‘सत्य’

चंद्रकांत पाटलांचा सवाल, म्हणाले – ‘संभाजीराजेंनी राजीनामा देऊन काय होणार? हे सरकार कोडगं’

.Pune : नगरसेवक शंकर पवार यांचे पीएमपी संचालकपदास तूर्तास ‘जीवनदान’; भाजपने पक्षातील नाराजांना ‘गाजर’ दाखवले !