वडिलांच्या निधनानंतर 7 दिवसातच दिव्या अग्रवालचं ‘असं’ फोटोशुट ! ट्रोल झाल्यानंतर म्हणाली…

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    फेमस टीव्ही अ‍ॅक्ट्रेस दिव्या अग्रवाल (Divya Agarwal) सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होताना दिसत आहे. दिव्याच्या वडिलांचं अलीकडेच कोरोनामुळं निधन झालं होतं. यांनतर 7 दिवसताच तिनं सोशलवर ग्लॅमरस आणि् बोल्ड फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी समाचार घेत तिला नको ते सुनावलं आहे.

एका युजरनं तिला ट्रोल करताना लिहिलं की, वडिलांच्या निधनानंतर 7 दिवसातच तुला असलं फोटोशुटं करताना लाज नाही वाटली का ? असा सवाल केला आहे.

एका युजरनं लिहिलं की, तुला वडिल नाही तर पैसा महत्त्वाचा आहे. तू पैशांसाठी इतक्या लवकर वडिलांनाही विसरलीस.

दिव्याला या ट्रोलिंगनं काहीच फरक पडला नाही. तिनं उलट ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ट्रोलर्सच्या कमेंटचे स्क्रीनशॉट्स शेअर करत तिनं संताप व्यक्त केला आहे.

दिव्यानं पोस्ट शेअर करत लिहिलं की, या क्षणी मी काय करावे अशी तुमची अपेक्षा आहे ? वडिलांचं निधन हे माझ्या आयुष्यातील कधीही न भरून निघणारं दु:ख आहे. पण म्हणून मी केवळ रडत बसावं असं तुम्हाला वाटतं का ? खरोखर हे जग खूप क्रूर आहे. लोकांना दु:खात पाहून आनंद मानणाऱ्या लोकांची इथे कमतरता नाही असं म्हणत तिनं संताप व्यक्त केला.

वडिलांच्या निधनानंतर 2 दिवसांनी मी कामावर परतत असल्याची पोस्ट दिव्यानं शेअर केली होती. शो मस्ट गो ऑन, मी एक हिंमतवान मुलगी आहे. माझ्या वडिलांना माझा अभिमान वाटावा असं मी करेन असंही पोस्ट शेअर करताना ती म्हणाली होती.

दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती स्प्लिटविला आणि एस ऑफ स्पेस अशा शोमध्ये झळकली आहे. रागिनी एमएमएस 2 या वेब सीरिजममध्येही तिनं टायटल रोल केला होता.