‘मृत्यूच्या दिवशी दिव्या भारतीने साईन केली होती ही डील’

मुंबई  : वृत्तसंस्था – आज आपल्यात अभिनेत्री दिव्या भारती नाही. पण ५ एप्रिल १९९३ रोजी दिव्याने अचानक जगाचा निरोप घेतला आहे. मृत्यूच्या वर्षभराआधी दिव्याने साजिद नाडियाडवाला सोबत गुपचूप लग्न केले होते, असे मानले जाते. मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतरच दिव्याच्या रहस्यमय मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू का झाला, कसा झाला, हे रहस्य आज इतक्या वर्षांनंतरही कायम आहे. दिव्याच्या मृत्युकडे संशयाने पाहणारे लोक तिचा कथित पती साजिद नाडियाडवाला याला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार धरतात. पण हे कधीच सिद्ध होऊ शकले नाही. आज दिव्या आपल्यात असती तर वाढदिवस साजरा करत असती. आजच्या म्हणजे २५ फेब्रुवारीला दिव्या जन्मली होती.

५ एप्रिल १९९३ रोजी आपल्या फ्लॅटच्या खिडकीतून पडून दिव्याचा मृत्यू झाला. ज्या दिवशी दिव्याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी ती चेन्नईहून शूटींग करून परतली होती. यानंतर ती हैदराबादेत शूटींगसाठी जाणार होती. आपल्या नव्या फ्लॅटचे डीलही तिले साईन केले होते. त्यावेळी दिव्याच्या पायाला दुखापत झाल्याने तिने हैदराबादेतील शूटींगचा प्लान रद्द केला आहे. पण आपल्या फ्लॅटच्या इंटरेरियर डिझाईनसाठी ती नीता लुल्ला व तिचा पती श्याम लुल्ला यांना भेटली होती. रात्री १० वाजता हे तिघेही भेटले. तिघांनीही एकत्र ड्रिंक घेतली.

असे म्हणतात की, दिव्याची मेड अमृता किचनमध्ये होती. नीता व श्याम लिव्हींग रूममध्ये व्हिडिओ पाहण्यात मग्न होते. दिव्या काही वेळानंतर खिडकीकडे गेली. बराच वेळ ती खिडकीत बसून होती. पण तिथून उठून वळताना अचानक तिचे संतुलन बिघडले आणि ती पाचव्या मजल्यावरून खाली पडली. दिव्याच्या या खिडकीला ग्रिल नव्हती. त्या दिवशी पार्किंग एरियात एकही गाडीही उभी नव्हती. दिव्या थेट पार्किंग एरियाच्या जमिनीवर पडली. तिचे शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पण श्वास अजूनही सुरु होता. यानंतर दिव्याला तातडीने मुंबईच्या कूपर हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. पण उपचारादरम्यान दिव्याने अंतिम श्वास घेतला.
You might also like