Death Anniversary : दिव्या भारतीनं मृत्यूच्या दिवशीच केली होती ‘ही’ डील साईन !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री दिव्या भारतीने दिवाना, बलवान, दिल आशना है, दिल तो है आणि रंग यासारखे सुपरहिट सिनेमे तिने चित्रपटसृष्टीला दिले. आज ती आपल्यात नाही. 5 एप्रिल 1993 रोजी दिव्याने अचानक जगाचा निरोप घेतला. त्यावेळी ती केवळ 19 वर्षांची होती. 1992 मध्ये विश्वात्मा या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटातील ‘सात समंदर पार मैं…’ या गाण्याने ती रातोरात स्टार झाली. हे गाणे हिट होताच दिव्याला 10 चित्रपट मिळाले. दिव्याने आपल्या छोट्याशा करिअरमध्ये 12 चित्रपट केले.

मृत्यूच्या एकवर्ष आधी गुपचूप लग्न
दिव्याने मृत्यूच्या एकवर्ष आधी साजित नाडियाडवालसोबत गुपचूप लग्न केले होते, असे मानले जाते. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांनतर दिव्याचा रहस्यमय मृत्यू झाला. तिचा मृत्यू का झाला, कसा झाला, हे रहस्य आज 25 वर्षानंतरही उलगडलेले नाही. दिव्याच्या मृत्यूला तिचा पती साजीद हाच जबाबदार असल्याचा संशय लोकांना आहे. पण हे कधीच सिद्ध होऊ शकले नाही.

असा झाला मृत्यू
दिव्याचा मृत्यू 5 एप्रिल 1993 मध्ये झाला. आपल्या फ्लॅटच्या खिडकीतून पडून तिचा मृत्यू झाला. ज्या दिवशी दिव्याचा मृत्यू झाला, त्याच दिवशी ती चेन्नईहून शूटींगवरून परतली होती. यानंतर ती हैदराबादमध्ये शुटींगसाठी जाणार होती. आपल्या नव्या फ्लॅटचे डीलही तिने साईन केले होते. पण दिव्याच्या पायाला दुखापत झाल्याने ऐनवेळी तिने हैदराबादेतील शुटींगचा प्लॅन रद्द केला होता. परंतु त्याच दिवशी इंटरेरियर डिझाईनरसाठी ती नीता लुल्ला आणि तिचा पती श्याम लुल्ला यांना भेटली होती.

पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू
रात्री दहाच्या सुमारास दिव्या,नीता आणि तिच्या पतीने एकत्र ड्रिंक घेतली असे बोलले जातेय. दिव्याची मेड अमृता त्यावेळी किचनमध्ये होती. तर निता आणि श्याम लिव्हींग रुममध्ये व्हिडिओ पाहता होते. दिव्या काही वेळाने खिडकीकडे गेली. बराच वेळ ती खिडकीत बसून होती पण तिथून उठून वळताना अचानक तिचे संतूलन गेल्याने ती पाचव्या मजल्यावरून खाली पडली. दिव्या ज्या खिडकीतून खाली पडली त्या खिडकीला ग्रिल नव्हते. त्या दिवशी पार्कींग एरियामध्ये एकही गाडी नव्हती. ती थेट जमीनीवर पडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. खाली पडली त्यावेळी तीचा श्वास सुरु होता. तिला तात्काळ मुंबईच्या कूपर हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.