‘जास्त गोरेपणामुळे सिनेमा गमावल्याची आजही खंत’, ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जास्त गोरेपणा असल्यानं एकेकाळी सिनेमे मिळत नव्हते असा गौप्यस्फोट एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं केला आहे. आव्हानात्मक भूमिका साकारण्यासाठी ही अभिनेत्री नेहमीच तयार असते. एका मुलाखतीत तिने नुकताच हा गौप्यस्फोट केला आहे. दिव्या दत्ता असं या अभिनेत्रीनचं नाव आहे. नुकतीच तिनं एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी तिने काही खुलासे केले.

दिव्या दत्ता म्हणाली, “वीर झारा सिनेमात काम केल्यानंतर मला हे समजलं की, भूमिका ही फक्त ग्लॅमरस असणं महत्त्वाचं नसतं. भूमिका तुम्ही किती प्रभावीपणे मांडू शकता हे महत्त्वाचं असतं, मग ती भूमिका कितीही साधी का असेना. ग्लॅमरपेक्षा सिनेमाची कथा आणि भूमिकेकडे सध्या लोकांचा कल जास्त आहे. एका दिग्दर्शनकानं मला सांगितलं की, एका फेमस अ‍ॅक्ट्रेसला सिनेमातील माझी भूमिका साकारायची इच्छा होती. एकेकाळी भूमिका छोटी असल्यास ती नाकारली जात होती. परंतु आता भूमिका छोटी असली तरी ती प्रभावशाली आहे का हे आधी पाहिलं जातं. ”

गोरेपणामुळे गमावली भूमिका
पुढे बोलताना दिव्या म्हणाली, “सारांश या सिनेमात अनुपम खेर यांनी वृद्धाची भूमिका साकारली होती तर नरगिस यांनी करिअरच्या शिखरावर असताना मदर इंडिया सिनेमात आईची भूमिका साकारली होती. भूमिका कोण साकारतंय यापेक्षा ती कशी साकारतंय हे जास्त महत्त्वाचं आहे. मी गोरेपणामुळे एक सिनेमा गमावला होता. खेडे गावातील एका महिलेची भूमिका होती. दिग्दर्शक मला म्हणाले होते की, तू या भूमिकेसाठी योग्य नाहीस तू फार गोरी आहेस. माझ्या वर्णामुळे मला भूमिका मिळाली नाही याची आजही मला खंत आहे. दिल्ली 6 या सिनेमात मी सावळी दिसावी यासाठी तसा मेकअप करण्यात आला होता. पहाटे चार वाजता मी मेकअपसाठी सेटवर जात असे.”

दिव्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं दिल्ली 6, भाग मिल्खा भाग, बदलापूर अशा सिनेमात दमदार अभिनय केला आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !