Divya Gunde | जिल्हाधिकारी नयना गुंडे यांची कन्या दिव्या गुंडे UPSC परीक्षेत उत्तीर्ण

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन युपीएससी परीक्षेचा निकाल (UPSC Exam Result) शुक्रवारी (दि.24) जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे (Collector Nayana Gunde) यांची कन्या 338 व्या रँकने उत्तीर्ण झाली आहे. दिव्या गुंडे (Divya Gunde) हिने प्राप्त केलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. दिव्याने (Divya Gunde) ऑक्टोबर 2020 मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीची परीक्षा दिली होती.

21 सप्टेंबर 2021 रोजी दिल्ली येथे दिव्याची मुलाखत झाली होती. केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी निकाल जाहीर केला असून यामध्ये दिव्याने 338 व्या रँकने उत्तीर्ण झाली आहे.
येत्या काही दिवसांमध्ये आयोगामार्फत पदस्थापना (Posting) मिळणार आहे.
प्रशासकीय स्तरावर याची माहिती समजताच अपर जिल्हाधिकारी राजेश खवले (Additional Collector Rajesh Khawale) यांनी दिव्या गुंडे आणि तिची
आई जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे अभिनंदन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट (Sub-Divisional Officer Vishwas Shirsat), तहसीलदार आदेश डफड,
अपर तहसीलदार अनिल खळतकर, मुख्याधिकारी न.प.करण चव्हाण,आकाश चव्हाण, किशोर राठोड व अधिकारी उपस्थित होते.

यशाचे श्रेय आई-बाबांना

दिव्या गुंडे हिने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आपल्या यशाचे श्रेय आई नयना गुंडे आणि वडिल अर्जुन गुंडे यांना दिले आहे.
तसेच या यशामध्ये मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. नाशिक, शिक्षक व मार्गदर्शक यांचा मोलाचा वाटा असल्याचे दिव्याने सांगितले.
तिच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया यांच्यामार्फत तिचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले.

 

Web Title : Divya Gunde | Collector Nayana Gunde’s daughter Divya Gunde passes UPSC exam

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime | राष्ट्रवादी नगरसेवकाच्या पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याकडून 13 लाखांचा अपहार

Zilla Parishad Election | ZP, पंचायत समिती पोट निवडणुका ठरल्याप्रमाणे होणार – इलेक्शन कमिशन

UPSC Final Result 2020 | सिव्हिल सर्व्हिसेस 2020 चा रिझल्ट लागला, शुभम कुमार ने केले टॉप, टीना डाबीच्या बहिणीने 15वी रँक मिळवली