अभिनेत्री दिव्या खोसला कुमार ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये झाली ‘OOPS MOMENT’ ची शिकार (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॅक्मे फॅशन वीकमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार रॅम्प वॉक करताना दिसत आहे. सध्या मुंबईत लॅक्मे फॅशन वीक सुरू आहे. या फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक करताना अनेक अभिनेत्री उप्स मूमेंटच्या शिकार होत असतात. टी सीरिज एमडी भूषण कुमार यांची पत्नी दिव्या खोसला कुमारसोबतही असंच काही झालं आहे. आपल्या सुंदर अंदाजात रॅम्प वॉक करताना दिव्याच्या लेहंग्यासोबत गडबड झाली.

दिव्या शो स्टॉपर बनली होती. तिनं ग्रे कलरचा लेहंगा घातला होता. रॅम्प वॉक करताना तिच्या लेहंगा अचानक निसटला असता. लेहंग्याचं हुक निसटल्यानं दिव्या अडचणीत सापडली होती. परंतु तिनं वेळेतच लेहंगा सावरला आणि वॉकही पूर्ण केलं. तिनं फ्रॉसिल ग्रे कलर लेहंग्यासोबत डीप फ्रंट नेकलाईन ब्लाऊज घातला होता. यात तिचं हॉट क्लीव्हेज स्पष्ट दिसत होतं. दिव्या खूपच सुंदर आणि हॉट दिसत होती. तिच्या आत्मविश्वासाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. सध्या दिव्याचा हा उप्स मूमेंटवाला व्हिडीओ मात्र सोशलवर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

केवळ उपस्थितांनीच नाही तर सोशल मीडियावरही नेटीझन्सनं दिव्याचं कौतुक केलं आहे. तिचं रॅम्प वॉक आणि लेहंग्यासोबत गडबड झाल्यानंतर तिनं दाखवलेलं प्रसंगावधान अनेकांना आवडलं आहे.

You might also like