संतापजनक ! सौंदर्य बनलं हत्येचं कारण, ‘केस’ आणि ‘भुवया’ देखील कापल्या, शरीरावर 33 जखमा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : 22 वर्षांच्या मुलीचे सौंदर्य तिचेच शत्रू बनले. ज्या घरात ती भाड्याने एकटी राहत होती तिच्या घर मालकिणीने तिचा वेश्या व्यवसायासाठी छळ केला, तिचे केस कापले आणि भुवया देखील कापल्या. तिच्या मृतदेहावर एकूण 33 जखमा आढळल्या आणि 5 दिवस अन्न- पाण्याशिवाय ठेवले. मृत्यूनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था केली गेली, परंतु नंतर हे रहस्य समोर आले. रविवारी पोलिसांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमच्या चर्चित दिव्या मर्डर प्रकरणातील 6 आरोपींना अटक केली. पोलीस तपासणीत 22 वर्षांच्या मुलीची निर्दयपणे हत्येच्यामागे देह व्यापारात ढकलण्याचे धक्कादायक सत्य समोर आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या मर्डर प्रकरणातील मुख्य आरोपी तिची घर मालकीण गुंताला वसंता आहे. जिने दिव्याला लैंगिक व्यापारात ढकलण्यासाठी छळ करून तिची हत्या केली होती. पोलिसांना गुरुवारी 22 वर्षीय मुलीचा संशयास्पद स्थितीत मृतदेह सापडला. आरोपी मुलीचा मृतदेह अंतिम संस्कारांसाठी नेत असताना या घटनेचा खुलासा झाला. याबाबत पोलिसांनी मृताच्या मालकिणीला विचारले असता तिने सांगितले की, दिव्याचा मृत्यू आजारपणामुळे झाला. नंतर पोस्टमार्टम रिपोर्ट आला तेव्हा दिव्याच्या शरीरावर 33 जखमा दिसल्या. त्यांनतर दिव्याचा छळ करून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले.

दिव्याच्या हात आणि पायांवर जळत्या लाकडाने चटके देण्यात आले होते. तिचे केस कापले गेले आणि भुवया देखील शेव करण्यात आल्या. पाच दिवस तिला उपाशी ठेवण्यात आले. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. आरोपी महिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी चतुराईने दिव्याच्या शरीरावर फुलांनी झाकले आणि रात्री अंत्यसंस्कार करण्याचा विचार केला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नेला जात असता वाहन चालकास काही प्रमाणात संशयास्पद वाटले, त्याने लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली.

पोलिसांचा असा विश्वास आहे की, वसंताला तिला लैंगिक व्यापारात ढकलण्याची इच्छा होती आणि तिने तिला घर रिकामे करण्याची धमकीही दिली. दिव्या तिच्यापेक्षा जास्त सुंदर असल्याने वसंता तिच्यावर जळत होती. दरम्यान, 2015 मध्ये काही अज्ञात लोकांनी दिव्याची आई, भाऊ आणि आजीचीही हत्या केल्याचे पोलिसांना तपासात आढळले, ज्याची चौकशी चालू आहे. याप्रकरणी पोलिसांनी वसंता, तिची बहीण मंजू उर्फ संध्या, आई धनलक्ष्मी, मेहुणे संजय, गीता कुमारी आणि वसंतची मावशी कांतीवेनी यांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात भादंवि कलम 302, 343, 324, 326 आणि इलीगल ट्रैफिकिंग ऑफ ह्यूमन बीईंग कलम 201 आणि 294 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.