मुरबाडमध्ये दिव्यांगांना मिळणार ‘नवजीवन’

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाइन – मुरबाड येथे मुरबाड शहापूर कुणबी समाज उन्नती मंडळ, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत दिव्यांग मेळाव्यात तपासणी करून घेण्यासाठी रायगड, ठाणे, शहापूर, भिवंडी, कल्याण, मुरबाड आदी भागांतून मोठ्या संख्येने विविध प्रकारचे दिव्यांग व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात जवळ-जवळ १२७ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली.

प्रत्येकाने दिव्यांग बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, त्यांनाही भावना असतात व त्या प्रत्येकाने जोपासण्याचा प्रयत्न करावा, पुढच्या काळात शासनाच्या विविध प्रकारच्या योजना दिव्यांगाना मिळवून देण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने प्रयत्न केले जातील, दिव्यांगांची सेवा म्हणजे खरीखुरी सामाजिक बांधिलकी, असे प्रतिपादन तालुक्याचे माजी आमदार गोटीराम पवार यांनी कुणबी भवन येथे आयोजित केलेल्या दिव्यांग मेळाव्यात केले

येत्या २९ डिसेंबर रोजी या सर्व दिव्यांग व्यक्तीना मोफत साहित्य वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मुरबाड तालुकाध्यक्ष शांताराम बांगर, शहापूर तालुका अध्यक्ष मधुकर फर्डे यांनी दिली. यावेळी गणपत विशे, जयराम पडवल, पांडुरंग कोर, परशुराम भोईर, अप्पा घुडे, खंडू चौधरी, डॉक्टर अजित जाधव, रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या डॉ. नंदा ठक्कर, डॉ. रामसुजाण साकेत, बुधाभाई जाधव उपस्थित होते.