अपंग तरुणीवर अत्याचार : प्रकरण ६ महिन्यानंतर उघड

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन

गावातीलच तरूणाने एका तीस वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची घटना जळगावमधील रावेर तालुक्यात घडली आहे. तब्बल सहा महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिला शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता ती तरुणी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत उघड झाले. याप्रकरणी अत्याचार करणाऱ्या यशवंत सुरेश इंगळे या तरुणाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4eadce33-d029-11e8-87f6-890a1bda258f’]

रावेर तालुक्यातील या पीडितेस काही वर्षांपूर्वी पक्षघाताचा झटका आला होता. त्यात ती काही प्रमाणात अपंग झाली आहे. त्यामुळे तिचे लग्नदेखील झालेले नव्हते. दरम्यान, ६ महिन्यांपूर्वी ही तरुणी गावाबाहेर शौचासाठी गेली असताना यशवंत इंगळेने तिच्यावर अत्याचार केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. जीवे मारण्याच्या धमकीमुळे तरुणीने हा प्रकार घरी कुणालाही सांगितला नव्हता. दरम्यान, तिच्या पोटात दुखू लागल्याने तिच्या आईने रविवारी तिला जळगावात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी आणले. तपासणी अंतर्गत गर्भवती असल्याचे निदान झाले.

[amazon_link asins=’B0768YVD7B’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’588137fa-d029-11e8-a251-0973064f13c9′]

या प्रकारामुळे पीडित मुलीच्या आईलादेखील धक्का बसला. यानंतर आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता यशवंत इंगळे याने अत्याचार केल्याची माहिती तिने आईला दिली. त्यानुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पीडित मुलगी व तिच्या आईने तक्रार दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. पी. पाटील यांनी पीडित मुलीचा जबाब घेऊन बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा सावदा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.