…म्हणून दिव्यांग महिलेने निवेदनावर पायांनी सह्या करीत लोकशाही दिनात मांडली कैफियत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कायमस्वरुपी वास्तव्यास असलेल्या जागेवर घर बांधण्यासाठी परवानगी असताना मनेगावचे (ता. कोपरगाव) ग्रामसेवकास राजकीय पुढारी आर्थिक हित साधण्यासाठी विरोध करीत असून, घरकुल होण्यासाठी दिव्यांग महिलेने पायांनी विनंती अर्जावर सह्या करीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात आपली कैफियत मांडली.

विजय आढाव व त्यांची दिव्यांग पत्नी अनिता आढाव या मनेगाव (ता. कोपरागाव) येथे सासू सासर्‍यांच्या जागेवर वास्तव्यास आहे. अनिता आढाव यांना दोन्ही हात नसून, त्या शंभर टक्के अपंग आहेत. अनेक वर्षापासून ते सदर जागेवर वास्तव्यास आहे. घराच्या बांधकामासाठी त्यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडून परवानगी देखील घेतली. मात्र आर्थिक हित व राजकीय द्वेषापोटी ग्रामसेवकांसह राजकीय पुढारी घर बांधण्यासाठी त्यांना विरोध करुन जातीवाचक शिवीगाळ व दमदाटी करीत आहे. तसेच सरपंच, ग्रामसेवक यांच्या सहमतीने गावाच्या घरकुल योजनेत मंजूर झालेल्या व्यक्तींच्या घरांचे काम थेट आमच्या खाजगी जागेत सुरु करण्यात आल्याचा गंभीर आरोप देखील अनिता आढाव यांनी केला आहे.

खाजगी जागेत घरकुलाचे काम चालू असलेले प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असून देखील तेथे बांधकाम चालू आहे. तर या स्वत:च्या मालकीच्या जागेत घर बांधण्यासाठी ग्रामसेवक व राजकीय पुढारी अडथळा आनत आहे. घराचे शेड सन 2000 साला पासून अस्तित्वात असताना घरकुलासाठी पात्र असून देखील घरकुल मिळण्यासाठी ग्रामपंचायत व राजकीय पुढारींनी विरोध दर्शविला आहे. गावाच्या सरपंच एक महिला असून, त्यांचे पती काशीनाथ आढाव हे गावगुंडांना हाताशी धरुन घरकुलाच्या नावाखाली त्यांनी पैसा उकळण्याचा धंदा सुरु केला आहे. परवानगी असताना आर्थिक लाभ मिळण्यासाठी घर बांधू देत नसल्याचा आरोप अनिता आढाव यांनी केला आहे. संबंधीतांकडून वारंवार जीवे मारण्याची धमकी मिळत असून, घर बांधण्यासाठी संरक्षण द्यावे अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

Visit : Policenama.com