CBSE च्या परीक्षेत 600 पैकी 600 गुण, दिव्यांशीचं ‘रेकॉर्ड’

लखनौ : वृत्तसंस्था – केंद्रीय माध्यमिक शिक्षक मंडळ (CBSE) चे निकाल १५ जुलै आधी जाहीर होतील, अशी माहिती देण्यात आली होती. त्याच पार्श्वभूमीवरती सोमवारी (दि. १३ जुलै) रोजी बारावीचा (CBSE) निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये लखनौ येथील नवयुग रेसिडेन्सची विद्यार्थीनी असलेल्या दिव्यांशी जैन हिने ६०० पैकी ६०० गुण मिळवत इतिहास रचला आहे. तिच्या या यशाबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

याबद्दल बोलताना दिव्यांशी जैन म्हणाली, सीबीएससीच्या बोर्ड परीक्षेत असे घवघवीत यश मिळेल, पैकीच्या पैकी मार्क मिळतील, असे स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. परंतु, सतत मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं, तसेच स्वअभ्यासाला मी प्राधान्य देत रिव्हीजन सुद्धा केली. दिव्यांशींचे वडील राकेश जैन यांचे लखनौ मध्ये दुकान असून, आई सीमा जैन या गृहिणी आहेत. तर यापूर्वी दिव्यांशीला शाळेत ९७.६ टक्के गुण मिळाले आहेत.

दिव्यांशी जैन चे प्रगती पुस्तक

इंग्लिश – १००
संस्कृत – १००
इतिहास – १००
भूगोल – १००
इश्योरेंस – १००
इकोनॉमिक्स – १००

निकाल पाहण्यासाठी हे फॉलो करा…

प्रथम निकाल पाहण्यासाठी सीबीएसईची अधिकृत बेवसाईट cbseresults.nic.in उघडा.

१. वेबसाईटवर देण्यात आलेल्या बारावी निकाल या लिंकवर क्लिक करा.

२. आपला रोल नंबर टाका आणि आवश्यक असलेली माहिती भरा.

३. त्यानंतर निकाल पाहता येईल आणि डाऊनलोड सुद्धा करता येईल.