विधानसभा निवडणूका स्वबळावर लढण्याची तयारी, शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांनं सांगितलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युतीचे जागावाटपाचे घोडे अडले आहे. अद्याप जागावाटप न झाल्याने शिवसेनेचे नेते स्वबळाची भाषा करू लागले आहेत. शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी पुन्हा एकादा स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा केली आहे. शिवसेना स्वबळावर लढण्यास तयार असून या निवडणुकीत शिवसेनचे सामर्थ्य दाखून देऊ आणि सर्व उमेदवारांना निवडून आणू असे रावते यांनी म्हटले आहे. सांगली येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

सांगलीत शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी दिवाकर रावते यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. युतीच काय होईल माहीत नाही. पण विधानसभेची निवडणूक शिवसेना जोशाने लढवणार आहे. तसेच आपला एक ना एक उमेदवार निवडून आणू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वी दिवाकर रावेत यांनी विधानसभा निवडणुकीत जागावाटपात शिवसेनेला 144 जागा मिळाल्या नाहीत तर युती तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही असे वक्तव्य करून खळबळ उडवून दिली होती.

दरम्यान, सांगलीतील मेळाव्यात रावते यांनी शिवसेना कार्य़कर्त्यांवर आणि पदाधिकाऱ्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. शिवसेनेची शिस्त हीच शिवसेना आहे असे म्हणत रावते यांनी कार्यकर्त्यांना सुनावले. मेळाव्याची वेळ 11 वाजताची असताना कार्य़कर्ते 12 वाजता आले. उशीराने येणाऱ्यांना पाठिमागे बसवून त्यांच्या गळ्यात हार घाला असा सल्ला रावते यांनी दिला.

Visit : policenama.com