दिवाळी २०१८ : जाणून घ्या लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  – दिवाळीचा जल्लोष सर्वत्र सुरू झाला आहे. सहा दिवस चालणाऱ्या दिव्यांच्या महोत्सवासाठी नागरिकांमध्ये आनंद दिसतो आहे. हिंदू संस्कृतीत दिवाळी या सणाला मोठे महत्व. हिंदू परंपरेनुसार सर्वात मोठा सण म्हणून दिवाळीचाच उल्लेख होतो. या सणाच्या निमित्ताने असंख्य दिव्यांनी आंगण घर उजळून निघते म्हणून या सणाला दीपावली असं म्हटलं जातं. लहान थोरांच्या आयुष्यात आनंद घेऊन येणाऱ्या या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात असतो.

यंदाची दिवाळी ही ४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. ५ तारखेला धनतेरस साजरी केली जाईल. तर यम चतुदर्शी ६ नोव्हेबरला आहे. लक्ष्मीपूजन ७ तारखेला केले जाईल तर ८ तारखेला दिपावली पाडवा आहे. त्यानंतर ९ नोव्हेंबरला देशभरात भाऊबीज साजरी केली जाईल. दिवाळीच्या दिवशी यश, किर्ती आणि धनलाभाची कामना करत महालक्ष्मीची पूजा केली जाते. असे म्हणतात की, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी लक्ष्मीसोबतच भगवान गणेश, विष्णू आणि कुबेराची पूजा करावी.

हिंदू धर्मामध्ये जसे सणाला महत्व आहे तसेच मुहूर्त देखील महत्वाचे आहेत. येणाऱ्या दिवाळीत केल्याजाणाऱ्या खरेदी आणि पुजेचे मुहुर्त खालील प्रमाणे…

नवीन वह्या खरेदी साठी मुहूर्त
बुधवार दि.३१/१०/२०१८
सकाळी ६.३५  ते ८.०१ लाभ, सकाळी ८.०१ ते ९.२६ अमृत, सकाळी  १०.५२ ते १२.१८ शुभ
दुपारी  ३.१० ते ४.३५ चंचल, दुपारी  ४.३५ ते ६.०१ लाभ, सायंकाळी ७.३५  ते ९.१० शुभ
रात्रौ ९.१० ते १०.४४ अमृत, रात्रौ  १०.४४ ते १२.१८ चंचल
धनतेरस : मिती आश्विन कृष्ण त्रयोदशी सोमवार ५/११/२०१८  रोजी धनत्रयोदशी आहे.
सोमवार ५/११/२०१८
सकाळी ६.३७ ते ८.०२ अमृत, सकाळी ९.२८ ते १०.५३ शुभ, दुपारी १.४३ ते ३.०८ चंचल, दुपारी ३.०८ ते ४.३४ लाभ, दुपारी ४.३४ ते ५.५९ अमृत, सायंकाळी ५.५९ ते ७.३४ चंचल, रात्रौ  १०.४३ ते १२.१८ लाभ, रात्रौ १.५३ ते ३.२८ शुभ, रात्रौ ३.२८ ते ५.०३ अमृत,
लक्ष्मीकुबेर पूजन : मिती आश्विन कृष्ण अमावास्या बुधवार ७/११/२०१८ रोजी लक्ष्मीकुबेर पूजन करावे.
बुधवार ७/११/२०१८
सकाळी ६.३८  ते ८.०३ लाभ, सकाळी ८.०३ ते ९.२८ अमृत, सकाळी १०.५३ ते १२.१८ शुभ, दुपारी ३.०८ ते ४.३३ चंचल, दुपारी ४.३३ ते ५.५८ लाभ, सायंकाळी ७.३३ ते ९.०८ शुभ, रात्रौ ९.०८ ते १०.४४ अमृत, रात्रौ  १०.४४ ते १२.१८ चंचल, रात्रौ ३.२८ ते ५.०३ लाभ (गोरज मुहूर्त सायंकाळी ५.५२) {सिंह लग्न रात्रौ १२.५४ ते ३.०२}
बलिप्रतिपदा : मिती कार्तिक शुक्ल प्रतिपदा शके १९४० विक्रम संवत २०७५ गुरुवार ८/११/२०१८ रोजी आहे. या दिवशीही वहीपूजन करता येते.
गुरुवार ८/११/२०१८
सकाळी ६.३९ ते ८.०३ शुभ, सकाळी १०.५३ ते १२.१८ चंचल, दुपारी १२.१८ ते १.४३ लाभ, दुपारी १.४३ ते ३.०८ अमृत, दुपारी ४.३३ ते ५.५८ शुभ, सायंकाळी ५.५८ ते ७.३३ अमृत, रात्रौ ७.३३ ते ९.०८ चंचल, रात्रौ १२.१८ ते १.५४ लाभ, रात्रौ ३.२९ ते ५.०४ शुभ,
काटा लावण्यासाठी शुभ मुहूर्त

सकाळी ६.३९ ते ८.०३ अमृत