जाणून घ्या : धनत्रयोदशी ते भाऊबीजपर्यंतच्या ‘तिथी’ आणि शुभ ‘मुहूर्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – थोड्याच दिवसात दिवाळीला सुरुवात होणार आहे. दिवाळीत प्रमुख पाच दिवस असतात ज्याचे प्रत्येकाच्या आयुष्यात विशेष स्थान आहे. धनत्रयोदशी,नरक चथुर्थी, दिवाळी, वसु बारस आणि भाऊबीज अशा पाचही दिवशी सगळीकडे आनंदाचे वातावरण पहायला मिळते.

धनत्रयोदशी ते भाऊबीजेपर्यंत सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातवरण असते यावेळी मंदिरांना तसेच घरांना आकर्षक लायटिंग केले जाते. जाणून घेऊयात कोणता सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल.

धनत्रयोदस
या दिवशी सुख आणि समृद्धीसाठी लक्ष्मी आणि कुबेराची प्रार्थना केली जाते. धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी धनवंतरीचा जन्म झाला होता म्हणून या दिवसाला धनत्रयोदस म्हणतात. या दिवशी चांगल्या कारणांसाठी दिवे लावले जातात.

शुभ मुहूर्त
शुक्रवार, 25 ऑक्टोबर
सायंकाळी 07:10 ते रात्री 08:15 पर्यंत

प्रदोष काळ – सायं 05:42 ते रात्री 08:15
वृषभ काळ – सायं 06:51 ते रात्री 08:47

दिवाळी
दिवाळी हिंदू धर्मातील सगळ्यात मोठा सण आहे या दिवशी घरी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. लक्ष्मी मातेच्या अराधनेने सुख आणि समृद्धी मिळते. त्यामुळे या दिवशी वेगवेगळ्या प्रकारे लक्ष्मी मातेची पूजा केली जाते.

रविवार, 27 ऑक्टोबर
लक्ष्मी पूजेचा शुभ मुहूर्त
साय 06:44 ते रात्री 08:15
प्रदोष काळ – सायं 05:40 से रात्री 08:14
वृषभ काळ – सायं 06:44 ते रात्री 08:39

भाऊबीज
या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्याबद्दल प्रार्थना करते. तसेच या दिवशी मृत्यूची देवता असलेल्या यमाची देखील पूजा केली जाते.
मंगळवार, 29 ऑक्टोबर
मुहूर्त – दुपारी 01:11 ते दुपारी 03:25