Diwali 2019 : फराळासाठी ‘अशा’ बनवा कुरकुरीत तांदळाच्या चकल्या !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सर्वत्र दिवाळीची लगबग पाहायला मिळत आहे. घरोघरी साफसफाईला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी दिवाळीचे खाद्यपदार्थ बनवण्यासही सुरुवात झाली आहे. कुटुंबातील लोकांना दिवाळीचे अनेक वेगळे पदार्थ आवडतात. यात चकली, करंजी, लाडू, चिवडा अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो. आज आपण वेगळ्या पद्धतीने चकली कशी बनवता येईल हे पाहणार आहोत. चला जाणून घेऊयात कुरकुरळीत तांदळाची चकली झटपट कशी तयार करता येईल.

साहित्य-

1) 500 ग्रॅम तांदूळ
2) 250 ग्रॅम फुटाणे
3) 2 चमचे तीळ
4) तिखट
5) मीठ(चवीनुसार)
6) हिंग
7) हळद
8) तेल

कृती-

1) तांदूळ धूवून ते वाळवा आणि नंतर गिरणीतून दळून आणा,

2) फुटाण्याची पूड करावी आणि ती चाळून घ्यावी.

3) तांदळाचे पीठ कोरडेच भाजून घ्या.

4) हे पीठ भाजल्यानंतर त्यात फुटाण्याची पूड, तिखट, हळद, हिंग आणि मीठ घालून पुन्हा पीठ भाजून घ्या.

5) पीठ भिजवण्यास थंड पाण्याचा वापर करावा.

6) यानंतर लगेचच चकल्या पाडा आणि तेळात तळून घ्या.

यानंतर तुम्ही गरम आणि कुरकुरीत चकल्यांचा आनंद घेऊ शकता.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like