दिवाळीचा फराळ खाताय ! मधुमेह, वाढत्या वजनांवर नियंत्रण कसे ठेवाल, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : दिवाळीचा फराळ म्हणजे सर्वांच्या आवडीचा विषय गोड- धोड खाण्याची संधी हा सण देत असतो. हा सण खवय्यांसाठी पर्वणीच असून या काळात कितीही नाही नको म्हटले तरी गोड, चमचमीत खाण्याचा मोह आवरता येत नाही. थोड खाल्ल तर काय फरक पडतो असे म्हणत आपण तेलकट, तुपकट पदार्थ खाल्ले जातात. परिणामी शरीरातील साखरेचे प्रमाण वाढून डायबिटीसच्या समस्या, फॅटफूल पदार्थांमुळे शरीरावरची अतिरिक्त चरबी वाढणे अशा आजारांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला दिवाळीचा फराळ खात असताना तब्येतीची कशी काळजी घ्यावी( how-control-diabetes-and-weight-festival-season) याबाबत सांगणार आहोत.

एका संशोधनानुसार दिवाळीच्या काळात लोकांच्या शरीरातील साखरच्या पातळीत वाढ होते. सण उत्सवांच्या काळात 250 मिलीग्राम डीएलच्या वरील लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण 15 टक्क्यांनी वाढ होते. 300 मिलिग्राम डीएलच्या वर लोकांमध्ये 18 टक्के वाढ दिसून आली होती. खासकरून दिवाळीच्या दिवसात जास्तीत जास्त तेलकट, गोड पदार्थांचा आहारात समावेश केल्याने या प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.

जास्त न खाता प्रमाणात खाः जर तुम्हाला डायबिटीसची समस्या असेल तर रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी एकाचवेळी खूप जास्त खाणे टाळावे. दिवसातून 3 ते 4 वेळा ठराविक वेळेचे अंतर राखून काहीतरी खात राहा. त्यामुळे रक्तातील साखरेच प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होईल, तसेच शरीराला पोषक तत्व मिळण्यास मदत होईल.

latest marathi news, latest news, latest news today, latest news today in marathi, marathi latest news, marathi news, marathi news india, news in marathi, policenama, policenama online,todays latest news, todays marathi news,
दिवाळीच्या वेळी मिठाई, पेठे खाण्यापासून रोखण खूप कठीण असते. जर तुम्हाला डायबिटीसचा त्रास असेल तर कमीत कमी गोड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा. गोड खाऊ वाटल्यास तुम्ही ताजी फळे खाऊ शकता. तसेच जास्तीत जास्त पाणी प्या त्यामुळे त्वचा आणि शरीर हायड्रेट राहण्यास मदत होईल.

गोड कमी खा : डायबिटीस असलेल्या लोकांनी असलेल्या दुधाच्या चॉकलेटऐवजी डार्क चॉकलेट खावे. वास्तविक, डार्क चॉकलेटमध्ये साखर कमी प्रमाणात असते, ज्याचा आरोग्यावर फारसा परिणाम होत नाही. गोड पेयाचे सेवन करण्यापेक्षा शुगर फ्री पेय किंवा नारळाचे पाणी हा उत्तम पर्याय ठरेल.

ब्राऊस राईस खा : अनेकांना पांढरा भात अधिक खाणे आवडते. कारण रोजच्या जेवणाचा तो भाग असतो. पण डायबिटीसच्या रुग्णांनी पांढरे तांदूळ खाणे टाळावे. कारण त्या तांदळामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स जास्त असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेच्या पातळीची वाढ होते. म्हणून पांढर्‍या तांदळाऐवजी ब्राऊस राईस खायला सुरूवात करा. दिवाळीच्या निमित्ताने या भाताचा आहारात समावेश केल्यास रक्तातील साखर नियंत्रण राहील.

तळीव पदार्थाचे अतिसेवन नको : दिवाळीनिमित्त विविध प्रकारचे तळलेले आणि मसालेदार पदार्थ तयार केले जातात. डायबिटीसच्या रुग्णांनी उत्सवाच्या वेळी , भजी, चकली यासारखे तळलेले पदार्थ खाऊ नयेत. याशिवाय, बिस्किट्स, केक यासारखे बेकरी पदार्थ पूर्णपणे टाळायला हवेत. जेणेकरून वजन वाढण्यापासून तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्यापासून बचाव करता येऊ शकते. याशिवाय मादक पदार्थाचे सेवन शारीरिक संतुलन बिघण्यासाठी कारणीभूत ठरू शकते. म्हणून दारू, सिगारेट अशा पदार्थाचे जास्त सेवन करू नये.